गुरुवारपासून बारावीची लेखी परीक्षा

By admin | Published: February 16, 2016 03:48 AM2016-02-16T03:48:23+5:302016-02-16T03:48:23+5:30

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत चालणार आहे

Written Examination from March to XII | गुरुवारपासून बारावीची लेखी परीक्षा

गुरुवारपासून बारावीची लेखी परीक्षा

Next

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत चालणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागातील ३ लाख, २० हजार, ७७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. नियोजित परीक्षा केंद्रांवर कसलाही गैरप्रकार घडू नये, याकरिता दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्त करण्यात आली आहे.
१ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ग्रेड तसेच प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. मुंबई विभागीय बोर्डांतर्गत ठाणेमधील १३६, रायडमधील ३७, दक्षिण मुंबईमधील ८१, मुंबई पश्चिम विभागातील १३२, तर मुंबई उत्तर विभागातील १०० अशा एकूण ५१८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून, प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बारावीच्या परीक्षेसाठी नियोजित परीक्षा केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार घडू नये, याकरिता चोख बंदोबस्त केला आहे. दिलेल्या मुदतीत परीक्षेचा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आदल्या दिवसापर्यंत मूळ परीक्षा फी आणि दंडाची रक्कम भरून परीक्षेला बसू शकता येईल तसेच वेळेवर अर्ज भरणाऱ्या परीक्षार्थींना त्वरित हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- सि. या. चांदेकर, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई

Web Title: Written Examination from March to XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.