पोलीस भरतीची लेखी परीक्षाही भर उन्हात
By admin | Published: June 30, 2014 02:28 AM2014-06-30T02:28:41+5:302014-06-30T02:28:41+5:30
शहर पोलीस आयुक्तालयाने पोलीस भरतीची लेखी परीक्षा भर उन्हात घेण्याचा पराक्रम गाजवला आहे.
Next
>नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाने पोलीस भरतीची लेखी परीक्षा भर उन्हात घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. लेखी परीक्षेसाठी पहाटेपासूनच कवायत मैदानावर दाखल झालेल्या 3,65क् उमेदवारांना भर दुपारी टळटळीत उन्हात आणि धुळीचा त्रस सहन करत दीड तास परीक्षेची शिक्षा भोगावी लागली. पोलीस भरतीप्रक्रियेत शारीरिक चाचणीत मुंबई आणि पुणो येथे सुमारे सात उमेदवारांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आणि या भरती प्रकरणी गृह खात्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले असतानाही पोलीस प्रशासनाने त्यापासून काहीच बोध घेतला नसल्याचा प्रत्यय रविवारच्या या परीक्षेने दिला आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाकडून 22 जून रोजी मैदानी चाचणीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्याच वेळी लेखी परीक्षेची तारीखही घोषित करण्यात आली होती. त्यानुसार, 471 जागांसाठी 4,281 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या सर्व उमेदवारांना रविवारी (दि.29 जून) सकाळी 6 वाजता कवायत मैदानावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज पहाटेपासूनच लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची गर्दी कवायत मैदानावर झाली. परीक्षेपूर्वी उमेदवारांना चेस्ट नंबर दिले जाणार होते. उमेदवारांना मैदानाबाहेरील आवारात बसविण्यात आले. तोर्पयत परीक्षेचे नियोजन करणारे आणि बंदोबस्ताला असणारे कर्मचारी कवायत मैदानावर हळूहळू दाखल होत होते. या कर्मचा:यांची हजेरी आटोपल्यानंतर उमेदवारांना चेस्ट नंबरसाठी पाचारण केले जाऊ लागले. मात्र, चेस्ट नंबर देऊन मैदानात प्रवेश देणो सोयीस्कर असताना पोलीस प्रशासनाकडून उमेदवाराचे हॉल तिकीट, ओळखपत्र आणि नंतर चेस्ट नंबर अशी वेळखाऊ प्रक्रिया राबविली गेली. परिणामी, एका उमेदवारासाठी सुमारे 15 मिनिटांचा वेळ खर्ची पडला. परीक्षेसाठी प्रत्यक्षात 3,65क् उमेदवार हजर झाले होते. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सकाळच्या वेळी होणो अपेक्षित असताना पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी पेपर प्रत्यक्षात हातात दुपारी 1 वाजेच्या सुमारास देण्यात आला. तोर्पयत उमेदवारांना खाण्यासाठीही काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
प्रशासनाचा दावा फोल
लेखी परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर कवायत मैदानावरच परीक्षा घेण्याचे नियोजन होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ‘पोलीस भरतीत परीक्षेची शिक्षा’ या मथळ्याखाली दि. 23 रोजी प्रसिद्ध केले होते. मैदानावर लेखी परीक्षा घेण्यापेक्षा ती शहरातील शाळा-महाविद्यालयांत घेणो शक्य होते. याबाबत, शहर पोलीस प्रशासनाने खुलासा करीत परीक्षेचे ठिकाणच निश्चित नसल्याचे सांगत सुव्यवस्थितरीत्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर, शहरातील काही महाविद्यालये व शाळांची पाहणी करून परीक्षेचे नियोजनही केले; मात्र पाऊस आला तरच त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होती.
अधिकारी तंबूत अन्..
उमेदवारांना मैदानावर तब्बल साडेअकरा ते पावणोतीन वाजेर्पयत भर उन्हात मांडी ठोकून जमिनीवर बसून चटके सहन करायला लावणा:या पोलीस अधिका:यांसाठी मात्र खास तंबूची व्यवस्था केलेली होती.