www.lokmatsakhi.com - या मनातलं बोलूया, म्हणूया मीच ती.. जी जगणं सुंदर करते !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:49 AM2021-07-13T05:49:57+5:302021-07-13T05:50:25+5:30
'लोकमत'ची नवी कोरी 'लेडीज स्पेशल' वेबसाईट लाँच.
कधी कधी वाटतं मीच ती..
स्वत:ला विसरून स्वप्नांच्या मागे धावणारी..
कधी कधी वाटतं मीच ती..
स्वत:लाच नाही तर स्वत:ची स्वप्नही विसरून ‘आपल्या माणसांसाठी’ जगणारी..
कधी अशी, कधी तशी, पण मीच ती.. सारी संकटं, सारी आव्हानं आणि साऱ्या परीक्षा देत जगण्यावर भरभरून प्रेम
करणारी ! लेकरांसाठी घरटं आणि स्वत:साठी स्वप्नांची दुनिया घडवणारी..
मीच ती..
मी..ती आणि आम्ही..
वाटतंच ना की आम्हालाही की, आपल्या मनातलं जिथं हक्कानं बोलता येईल, आपल्या मनातलं जिथं समजून घेतलं जाईल अशी हक्काची ‘आपली’ जागा असावी. पण फुकट मात्र सल्ले नकोत, कुणी ‘जज’ करायला नको, उपदेशाचे पोकळ डोसही नकोत..
तर हवी सोबत. आपल्यासोबत काही पाऊलं चालून आपल्या जगण्यात रंग भरणारी..
जशी धुंद कोसळणाऱ्या पावसात चहा-पुस्तकाची असते, मित्रमैत्रिणींची मैफल जमते, आपण फुलावं-बहरून यावं, जगण्याची उमेद मिळावी म्हणून आपलीच कुणी ‘सखी’ आपले कधी कान धरते, कधी मायेनं पाठीवर हात ठेवते, जगण्याचं बळ देते आणि म्हणते, मी सोबत आहे, तू पुढे हो ! जमेल तुला, होतील तुझीही स्वप्न पूर्ण..
मल्टीटास्किंग, टाइम मॅनेजमेण्ट, फुटबॉल मॉम, सुपर वूमन हे सारे शब्दही आता जुने झाले..
जगण्याची रॅटरेस किती पोकळ आहे हे ही समजले..बायकांनी स्वत:ला सिद्ध करुन तशी प्रमाणपत्रं मिळवण्याचीही गरज उरली नाही.
या साऱ्याहून महत्त्वाचा आहे, परस्परांच्या मदतीने मोठं होण्याचा निखळ आनंद. आपण आपल्या वेगानं बहरणं, आपल्या मनासारखं जगणं.
मात्र अवतीभोवतीच्या कलकलाटात कुठं मिळावी अशी जिवाभावाची दोस्ती जपणारी सच्ची साथ? स्पर्धा न करता साऱ्यांनी सोबत येत मोठं व्हावं, अशा जागा आता कितीशा उरल्या आहेत आयुष्यात..?
तर त्या प्रश्नाचंच हे उत्तर
जिवाभावाची मैत्री जपणारं आणि सोबत चालत जगण्याची सुंदर मैफल करणारं..
आपण जे आहोत, जसं आपल्याला व्हायचं आहे तो हा प्रवास.
मैत्रिणींचा हक्काचा कट्टा. मन मोकळं करण्याची, मिळून काही जगण्याची, साजरं करण्याची जागा म्हणजे www.lokmatsakhi.com
सौंदर्य, आहारविहार, फॅशन, मेकअप ते खाणंपिणं, पाककृती ते खाद्यसंस्कृती, आरोग्य, मानसिक आरोग्य, आर्थिक गुंतवणूक, लैंगिक प्रश्न आणि नाती, नात्यांचे वाढते आणि उलगडते काच
या साऱ्या विषयांसह मोकळेपणानं लिहिण्या-बोलण्या-वाचण्याची हक्काची जागा.
मीच ती.. असं वाटून स्वत:लाच भेटावं प्रेमानं अशी हक्काची जागा.