बारावी परीक्षा पेपर तपासणीस असहकार
By Admin | Published: February 23, 2017 02:55 AM2017-02-23T02:55:20+5:302017-02-23T02:55:20+5:30
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन
पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामास येत्या 3 मार्चपासून असहकार करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्याचा बारावीच्या परीक्षेवर किंवा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दरवर्षी शिक्षकांकडून असहकार आंदोलनाचा इशारा दिला जातो. मात्र,विद्यार्थी हितासाठी आंदोलन मागे घेवून शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासल्या जातात. यंदाही शिक्षकांच्या मान्यतेबरोबरच
वेतनाच्या प्रश्नासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीच्या कामास अहसकार करण्याचा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, शिक्षक संघटनेच्या मागण्या शासनस्थरावर विचाराधीन आहेत. मात्र, शिक्षकांच्या असहकार आंदोलनामुळे परीक्षांवर किंवा निकालावर परिणाम होणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासणी व निकालाची काळजी करू नये.