याकूब मेमनला ३० जुलैला देणार फाशी

By admin | Published: July 15, 2015 09:10 AM2015-07-15T09:10:51+5:302015-07-15T15:13:04+5:30

मुंबईत १९९३ सालच्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमन याला ३० जुलै रोजी फासावर लटकवण्यात येणार आहे.

Yakub Memon to hang on July 30 | याकूब मेमनला ३० जुलैला देणार फाशी

याकूब मेमनला ३० जुलैला देणार फाशी

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमन याला या महिनाअखेरीस फाशी होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याकूबला ३० जुलै रोजी सकाळी सात वाजता फासावर लटकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टाडा कोर्टाच्या आदेशानंतर फाशीचा हा निर्णय घेण्यात आला असून याकूबला नागपूर सेंट्रल जेलमध्ये  फाशी देण्यात येऊ शकते. मात्र फाशीचे ठिकाण ऐनवेळी बदलण्यातही येऊ शकते.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी याकूबची पुनर्विचार याचिका फेटाळली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने टाडा कोर्टाची परवानगी घेऊन त्याला फाशी देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू केली होती. मात्र याकूबने आपल्याला फाशीपासून सुटका मिळावी यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली तर याकूबची फाशी टळू शकते. मात्र न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यास १९९३च्या बाँबस्फोट खटल्यातील पहिल्या दोषीला फासावर लटकावण्याचा  राज्य सरकार मार्ग मोकळा होईल.
मुंबई बाँबस्फोटांप्रकरणात दोषी ठरलेल्या याकूबला टाडा कोर्टाने २००७ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यासाठी पैसे पुरवणे, दोषींच्या राहण्याची व्यवस्था करणे तसेच  प्रशिक्षणाची व प्रवासाची तिकीटे पुरवणे,बॉम्बस्फोटासाठी वाहनं पुरवणे आणि अवैध शस्त्र बाळगणे असे आरोप आहेत.  यापूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मेमनचा दया अर्ज फेटाळला होता. 
 

Web Title: Yakub Memon to hang on July 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.