याकूबच्या भावांचा पॅरोलसाठी अर्ज
By admin | Published: August 1, 2015 01:10 AM2015-08-01T01:10:51+5:302015-08-01T01:10:51+5:30
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी गुरुवारी नागपूर कारागृहात फाशी दिलेल्या याकूब मेमनचे भाऊ युसूफ आणि ईसा यांनी हर्सूल कारागृह प्रशासनाकडे १५ दिवसांच्या पॅरोल रजेसाठी अर्ज
औरंगाबाद : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी गुरुवारी नागपूर कारागृहात फाशी दिलेल्या याकूब मेमनचे भाऊ युसूफ आणि ईसा यांनी हर्सूल कारागृह प्रशासनाकडे १५ दिवसांच्या पॅरोल रजेसाठी अर्ज सादर केला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. हे दोघेही याच प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
याकूबच्या फाशीची माहिती मिळाल्यानंतर युसूफने जेवण सोडल्याचे कळते. त्यामुळे त्याची प्रकृतीही ढासळत आहे. याकूबच्या अंत्यविधीला त्यांना उपस्थित राहता आले नाही. युसूफ आणि ईसा यांनी मुंबईला जाण्यासाठी जेल प्रशासनाकडे १५ दिवसांची पॅरोल रजा मिळावी, यासाठी अर्ज सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या रजेचा अर्ज प्राप्त होताच प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.