मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांना ‘यमाचे दर्शन’

By admin | Published: May 15, 2017 06:28 AM2017-05-15T06:28:34+5:302017-05-15T06:28:34+5:30

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून सुरूअसलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये

'Yama Darshan' for mobile operators speaking on mobile | मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांना ‘यमाचे दर्शन’

मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांना ‘यमाचे दर्शन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून सुरूअसलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये ‘सेल्फी विथ यमराज’ या प्रयोगाची शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयाजवळील चौकात सुरुवात झाली.
मोबाइलवर बोलत धोकादायकपणे वाहन चालविणाऱ्यांना थांबवून वाहतूक पोलिसांनी थेट यमाचे दर्शन घडवून मरणाची जाणीव करून दिली. यम ही मृत्युदेवता मानली जाते. प्रामुख्याने वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हा नियमभंग करणाऱ्यांना थांबवून यमराजाच्या रूपात असलेल्या कलाकारासोबत सेल्फी काढण्यात आला.
दुपारी १२ पर्यंत ही मोहीम सुरूहोती. पुन्हा नियमभंग करणार नाही, अशी शपथ वाहनचालकांना घ्यावयास सांगण्यात आले. नियमभंग करणाऱ्यांपैकी काहींना चुकीची जाणीव झाली.
पहिल्या तासभरामध्ये २० वाहनचालकांना यमराजासोबत सेल्फी काढायला लावण्यात आला. अप्पा आखाडे यांनी यमराजाची वेशभूषा करून पोलिसांना सहकार्य केले. वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, सुरक्षित वाहतुकीबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांपैकी ‘सेल्फी विथ यमराज’ हा उपक्रम होता.

Web Title: 'Yama Darshan' for mobile operators speaking on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.