धावत्या बससमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या

By Admin | Published: November 14, 2016 02:40 AM2016-11-14T02:40:11+5:302016-11-14T02:40:11+5:30

वाशिम जिल्ह्यातील वाकी फाट्यानजीकची घटना.

Yama's suicide by jumping in front of a moving bus | धावत्या बससमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या

धावत्या बससमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या

googlenewsNext

इंझोरी (जि. वाशिम), दि. १३- राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बससमोर उडी घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना रविवार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील वाकी फाट्यानजीक घडली. गजानन गोविंदराव आडे (वय ४0 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे.
कारंजा-मानोरा मार्गावर कारंजापासून ७ किलोमीटर अंतरावर वाकी व वाघोळा गाव आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता राज्य परिवहन महामंडळाची कारंजा येथून मानोराकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली एम.एच.४0 - ८६६४ क्रमांकाची बस ही वाकी फाट्याजवळ येताच वाघोळा येथील गजानन आडे या इसमाने बससमोर अचानकपणे उडी घेतली. त्यामुळे बसखाली चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याप्रकरणी बसचालकाने थेट कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दाखल केली. गजानन आडे यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Yama's suicide by jumping in front of a moving bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.