पुण्यात "यमराज विथ सेल्फी" मोहीम
By Admin | Published: May 13, 2017 06:46 PM2017-05-13T18:46:41+5:302017-05-13T18:46:41+5:30
तुम्ही गाडी चालवत आहात आणि समोर साक्षात यमराजाचे दर्शन झाले तर? ऐकून थोडे घाबरलात ना?
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - तुम्ही गाडी चालवत आहात आणि समोर साक्षात यमराजाचे दर्शन झाले तर? ऐकून थोडे घाबरलात ना? मोबाईलवर बोलल्यामुळे कधींनाकधी तरी ही वेळ तुमच्यावर नक्कीच येऊ शकते, हाच संदेश देण्यासाठी वाहतूक शाखा पुणे शहरच्या वतीने शनिवारी " यमराज विथ सेल्फी " ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलणे असे नियम तोडणाऱ्या पुणेकरांचे यमराजाबरोबर सेल्फी काढून वाहतुकीचे नियम तोडणार नाही असे कबूल करून घेण्यात आले.
फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकापासून सकाळी 10 वाजता वाहतूक विभागाचे उपायुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा पुणे शहर आणि लायन्स क्लब ऑफ पुणे स्मार्ट सिटी यांच्या वतीने या विशेष मोहिमेला सुरुवात झाली.
सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, महेश सरतापे, लायन्सचे ऍड डोंगरे यात सहभागी झाले होते. अप्पा आखाडे यमराजाच्या वेशभूषेत पुणेकरांना दर्शन देत होते, नियम तोडणाऱ्या 20 पुणेकरांचा त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला. काही पुणेकर देखील उत्साहात त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा आंनद लुटत होते