यशवंत सिन्हा यांच्यासह आंदोलकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:41 AM2017-12-05T05:41:37+5:302017-12-05T05:41:54+5:30
उत्पादनाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, नाफेडच्या अटींमुळे नागवल्या जाणाºया शेतकºयांच्या समस्यांवर शासनाने उपाययोजना केल्याचा निरोप प्रशासनाकडून न आल्याने जाब विचारण्यासाठी
अकोला : उत्पादनाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, नाफेडच्या अटींमुळे नागवल्या जाणाºया शेतकºयांच्या समस्यांवर शासनाने उपाययोजना केल्याचा निरोप प्रशासनाकडून न आल्याने जाब विचारण्यासाठी निघालेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकरी जागर मंचच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत शेकडो कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली.
दारिद्र्य, विविध समस्यांनी घेरलेल्या शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचने गांधी-जवाहर बागेतून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी त्यांना अडवले. या वेळी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी ठिय्या दिला. विविध मागण्यांवर शासनाने काय केले, याबाबतची चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे जाऊ द्या, अन्यथा त्यांना येथे बोलवा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दुपारी ३.४० वाजता आंदोलकांची भेट घेतली.
कर्जमाफीची आकडेवारी सादर करण्याशिवाय इतर मागण्या शासन धोरणाशी संबंधित आहेत. त्यावर आपण बोलू शकत नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले आणि ते निघून गेले. दरम्यान, सिन्हा यांनी राज्य शासनाला एक तासाचा अल्टिमेटम देत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. दुपारी चार ते पाच या काळात तेथेच ठिय्या देत शासनाच्या निरोपाची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सोबतच त्यानंतर शेतकरी काहीही करण्यास मोकळे असल्याचा इशाराही दिला. शासनाकडून पाचपर्यंत कोणताही निरोप मिळाला नाही. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकाºयांकडे जाण्याची तयारी केली. त्याचवेळी पोलिसांनी यशवंत सिन्हा यांच्यासह सर्व आंदोलकांना अटक केल्याचे सांगितले. त्या सर्वांना वाहनातून पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.