यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरु निवड समिती गठीत

By यदू जोशी | Updated: February 1, 2023 13:58 IST2023-02-01T13:56:26+5:302023-02-01T13:58:56+5:30

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी निवड समिती गठीत केली आहे.

Yashwantrao Chavan Open University Vice Chancellor Selection Committee constituted | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरु निवड समिती गठीत

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरु निवड समिती गठीत

Yashwantrao Chavan Open University: एनसीईआरटीचे माजी संचालक प्रा. जगमोहन सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती गठीत करण्यात आली आहे. सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. अनुपम शुक्ला, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच भोपाळ येथील मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रवींद्र कान्हेरे (युजीसी प्रतिनिधी) हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ दिनांक ७ मार्च  २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपव‍िण्यात आला आहे.

Web Title: Yashwantrao Chavan Open University Vice Chancellor Selection Committee constituted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.