यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 02:30 AM2019-03-27T02:30:21+5:302019-03-27T02:30:42+5:30

नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले.

 Yashwantrao Chavan twice in merit; Nath Pai first and Ajit Pawar's last merit | यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

Next

- प्रेमदास राठोड

आजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात बाजी मारून एकूण ७४६ जण लोकसभेत पोहोचले. यापैकी फक्त १४ उमेदवार ७५ टक्क्क््यांहून जास्त मते घेऊन मेरिटमध्ये पास झाले. १४ मधील १० जणांना १९७१ च्या निवडणुकीत हे यश मिळाले. यशवंतराव चव्हाण हे दोनदा (सातारा १९७१ व १९७७) असे यश मिळवणारे एकमेव नेते ठरले. पीएसपीचे नाथ पै (राजापूर १९५७) वगळता मेरिटमध्ये आलेले बाकी सर्व १३ काँग्रेसचे होते. नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले. १९९१ नंतर महाराष्ट्रात कोणालाही एवढे मोठे यश मिळालेले नाही.
साताऱ्याने तब्बल तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेरिटसह उमेदवाराला पास केले. शेजारच्या कराडने दोनदा उमेदवाराला मेरिटसह लोकसभेत पाठविले. अमरावती, बारामती, भंडारा, खामगाव, खेड, मालेगाव, राजापूर, रामटेक, सांगली आणि वर्धा या १० दहा मतदारसंघांनी एकेकदा मेरिटसह उमेदवारांना लोकसभेत पाठविण्याचा विक्रम केला आहे.
१९७१ मध्ये कराडमधून विजयी झालेले दाजीसाहेब चव्हाण यांना ८६.१६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी इतर सर्व ६ जणांची अनामत जप्त झाली होती. दाजीसाहेबांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई यांना येथेच १९८४ मध्ये ८३.०९ टक्के मते मिळाली होती. दाजीसाहेब व प्रमिलाबाई यांचे सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी १९९१ ते ९८ तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकून येथे हॅट्ट्रिक केली. पण त्यांना ६२ टक्क्क््यांपेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत.

७५ टक्क्क््यांहून जास्त मतांसह लोकसभेत गेलेले इतर नेते
अमृत गणपत सोनार (१९७१ रामटेक, प्राप्त मते ८३.०२ टक्के), प्रतापराव भोसले (१९८९ सातारा, ८१.९४ टक्के), अर्जुनराव कस्तुरे (१९७१ खामगाव, ८०.६५ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर, ८०.६५ टक्के), गणपती गोटखिंडे (१९७१ सांगली, ७८.१७ टक्के), कृष्णराव देशमुख (१९७१ अमरावती, ७७.६१ टक्के), विश्वंभरदास दुबे (१९७१ भंडारा, ७६.५८ टक्के), जे.जी. कदम (१९७१ वर्धा, ७५.७३ टक्के), अनंतराव पाटील (१९७१ खेड, ७५.५४ टक्के), झामरू कहांडोळे (१९७१ मालेगाव, ७५.१९ टक्के) आणि अजित पवार (१९९१ बारामती, ७५.०४ टक्के) गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळ शेट्टी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मतांसह बाजी मारली. त्यापूर्वी २००९ मध्ये सर्वाधिक ६६.४६ टक्के मते सुप्रिया सुळे यांना मिळाली. शरद पवार यांना २०१४ (७१.०३ टक्के) व १९९८ (६५.८१ टक्के) या दोन निवडणुकांत राज्यातून सर्वाधिक मते मिळाली होती. या तिघांनाही ७५ टक्क्क््यांचा टप्पा मात्र गाठता आला नाही. गोपाळ शेट्टी व सुप्रिया सुळे यंदाही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Web Title:  Yashwantrao Chavan twice in merit; Nath Pai first and Ajit Pawar's last merit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.