यवत, चाकणमध्ये आगीचे तांडव
By admin | Published: September 20, 2014 11:29 PM2014-09-20T23:29:19+5:302014-09-20T23:29:19+5:30
यवत येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अचानक एका टेम्पोने पेट घेतल्याने तो पूर्ण जळाला. या वेळी टेम्पोमध्ये गॅसच्या तीन टाक्या असल्याने सर्वाचीच धावपळ उडाली होती.
Next
सुदैवाने जीवितहानी टळली : यवतमध्ये टेम्पोतील गॅस टाकीचा स्फोट, चाकणमध्ये कारखान्याला आग
यवत : यवत येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अचानक एका टेम्पोने पेट घेतल्याने तो पूर्ण जळाला. या वेळी टेम्पोमध्ये गॅसच्या तीन टाक्या असल्याने सर्वाचीच धावपळ उडाली होती. त्यातील एका टाकीचा मोठा स्फोट होऊन आगीच्या लोटासह मोठा आवाज झाला. सुदैवाने सदर घटनेत कसलीही जीवितहानी अथवा जखमी झाले नाही. ही घटना आज (दि.2क्) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली .
पुणो-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, महामार्गावर पांढरे पट्टे मारण्यासाठी सदर टेम्पोमध्ये बॉयलरसह इतर कच्ची सामग्री ठेवून काम सुरू होते. टेम्पो चालक अनिकेत चव्हाण व सदर काम करणारे कामगार आवश्यक सामग्री नेण्यासाठी यवतमध्ये आले असता, टेम्पो ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभा करून चहा पिण्यासाठी गेले होते. दरम्यान, बॉयलर सुरू असल्याने काही वेळाताच टेम्पोच्या टपासाठी असलेल्या ताडपत्नीने पेट घेतला .
आग लागल्याची समजण्याच्या आतच वेगाने आग पसरली. टेम्पोचालक चव्हाण याने आजूबाजूच्या नागरिकांना टेम्पोमध्ये बॉयलरसाठी ठेवलेल्या तीन गॅसच्या टाक्या असल्याचे सांगितल्याने वेळीच आजूबाजूची गर्दी लांब झाली. केवळ पंधरा ते वीस मिनिटांत संपूर्ण टेम्पोने पेट घेतला होता. टेम्पो यवतमधील मुख्य वर्दळ असणा:या परिसरात पेटला होता. यामुळे बघ्यांची गर्दी जमू लागली होती. महामार्गाच्या पुणो बाजूकडे जाणा:या मार्गावरील वाहतूक थांबली होती. यवत पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच सदर घटना सुरू होती. त्यामुळे पोलीसदेखील नागरिकांना दूर होण्यास सांगत होते. अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले होते. यवतमधील पेट्रोलपंपाचे चालक आश्विन श्रोत्नी यांनी आग विझविण्यासाठी पंपावरील आग प्रतिबंधक धुळीचा मारा करून पाहिला. परंतु, आग आटोक्यात आली नाही.
आग वाढत जाऊन काही वेळातच टेम्पोमधील एका गॅसच्या टाकीचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने सर्वच बघे दूर पळाले. स्फोट इतका भयंकर होता की, टेम्पोच्या मागील भागाचा पत्ना दूरवर उडाला व आगीचा लोट मोठा होत ग्रामपंचायत कार्यालयार्पयत पोहोचला होता. गॅसची टाकीदेखील दूरवर फेकली गेली होती. सुदैवाने गर्दी असलेल्या भागात कसलीही हानी झाली नाही. यानंतर ठराविक काळाने तीन टायरचे स्फोट झाले. उर्वरित दोन गॅस टाक्या मोकळ्या असल्याने त्यांचे स्फोट झाले नाहीत. परंतु, भीती मात्न कायम होती. एवढय़ात भीमा-पाटस कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी आला.
4टेम्पोचालक चव्हाण याने आजूबाजूच्या नागरिकांना टेम्पोमध्ये बॉयलरसाठी ठेवलेल्या तीन गॅसच्या टाक्या असल्याचे सांगितल्याने वेळीच आजूबाजूची गर्दी लांब झाली.
4टेम्पो यवतमधील मुख्य वर्दळ असणा:या परिसरात पेटला होता. यामुळे बघ्यांची गर्दी जमू लागली होती. महामार्गाच्या पुणो बाजूकडे जाणा:या मार्गावरील वाहतूक थांबली होती.
4स्फोट इतका भयंकर होता की, टेम्पोच्या मागील भागाचा पत्ना दूरवर उडाला व आगीचा लोट मोठा होत ग्रामपंचायत कार्यालयार्पयत पोहोचला होता. गॅसची टाकीदेखील दूरवर फेकली गेली.
शनिवार असल्याने
मोठी हानी टळली
टेम्पोने ज्या ठिकाणी पेट घेतला तेथे यवत ग्रामपंचायतीचे कार्यालय, पोलीस ठाणो व पुणो जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने कायम गर्दी असते. मात्न, शनिवार असल्याने दुपारनंतर गर्दी नव्हती. गर्दीच्या वेळी सदर आग आणि गॅस टाकीचा स्फोट घडला असता, तर मोठी हानी होण्याची शक्यता होती. ऐन दुपारच्यावेळी गजबजलेल्या ठिकाणी स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. उर्वरित दोन गॅससिलेंडरचे स्फोट झाले असते तर मोठा अनर्थ झाला असता.
4चाकण : खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील पॉवर हाऊसमागे असलेल्या डीटीएल कंपनीला शनिवारी (ता. 2क्) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आकस्मिकपणो आग लागून करोडो रुपयांचे नुकसान झाले. तब्बल दोन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले असून, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
4याबाबतची माहिती अशी, की खराबवाडीहद्दीतील डीटीएल अन्सिलरिज पुणो प्रा.लि. या कंपनीच्या पेंट शॉपला आज दुपारी आकस्मिकपणो आग लागली. कंपनीचे संचालक विजय जैन व सिद्धार्थ जैन आगीची माहिती मिळताच घटनास्थळी हजर झाले. काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीतील कामगार व कर्मचा:यांनी प्रसंगावधान राखून टँकरच्या साह्याने आग विझवण्याचा प्रय} केला. आग लागताच कर्मचा:यांनी कंपनीतील गॅसचे सिलिंडर बाहेर हलविले.
4बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझवण्यास व्यत्यय येत होता. तब्बल एक तासाने पोलीस घटनास्थळी हजर झाले. चाकण एमआयडीसी, बजाज ऑटो, फोक्सवॅगन, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगीच्या बंबांनी आग आटोक्यात आणली.
4मंडलाधिकारी राजाराम मोराळे यांनी या घटनेची माहिती प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे
व तहसीलदार आवटे यांना
देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.