रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:03 AM2018-08-20T01:03:02+5:302018-08-20T01:03:21+5:30

१७२५ शेतकऱ्यांची नोंदणी; २ हजार हेक्टरवर होणार तुतीची लागवड

Yavatmal is the best in the field of silk farming | रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

Next

- रुपेश उत्तरवार 

यवतमाळ : कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आता रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी होत आहे. शासनाने या जिल्ह्यात ५०० हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना २ हजार हेक्टरवर लागवडीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. अन्य जिल्ह्यात लागवडीचे प्रमाण केवळ १०० ते १५० हेक्टर आहे. त्यामुळे रेशीम शेतीत यवतमाळ अव्वल ठरले आहे.
गुलाबी बोंडअळीने राज्यात कपाशीचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीला पर्याय म्हणून शेतकºयांनी रेशीम लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे. दोन हजार हेक्टरवर रेशीम (तुती) लागवडीसाठी शेतकºयांनी अर्ज केले आहे. तर १७२५ शेतकºयांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशनही केले आहे. ६५० हेक्टरवर लागवड आटोपली आहे. सप्टेंबरपर्यंत उर्वरित क्षेत्रात लागवड होणार आहे.
रेशीम विक्रीचे केंद्र हैदराबाद अथवा बंगळुरू या ठिकाणीच आहे. यामुळे रेशीम लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी आहे. यवतमाळ शहरात हे केंद्र उभे राहिल्यास लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता जात असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम कोषाचा दर क्विंटलला ३५ हजार रुपये आहे.
एका एकरात दीड क्विंटल उत्पन्न मिळते. वर्षभरात चार वेळा पीक घेता येते. यातून चार ते पाच क्विंटल उत्पन्न मिळते. सध्याच्या दरानुसार हे उत्पन्न दोन लाखांच्या घरात जाते.

६५० हेक्टरवर लागवड आटोपली. त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

Web Title: Yavatmal is the best in the field of silk farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.