यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी

By admin | Published: November 5, 2014 12:57 AM2014-11-05T00:57:16+5:302014-11-05T00:57:16+5:30

जिल्हा परिषद पदभरती प्रकरणातील पेपरफुटीचे तार जिल्हाधिकारी कार्यालयाशी जुळतात काय, याच्या चौकशीसाठी औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात तळ ठोकून आहे.

Yavatmal District Collector inquired | यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी

Next

पेपरफूट प्रकरण : औरंगाबाद पोलिसांची दोन स्वीय सहायकांसह पाच जणांना नोटीस
सतीश येटरे - यवतमाळ
जिल्हा परिषद पदभरती प्रकरणातील पेपरफुटीचे तार जिल्हाधिकारी कार्यालयाशी जुळतात काय, याच्या चौकशीसाठी औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात तळ ठोकून आहे. या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची तब्बल दीड तास चौकशी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन स्वीय सहायकांसह पाच जणांना औरंगाबाद येथे चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार लवकरच पोलिसांच्या जाळ्यात दिसतील, अशी माहिती औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
यवतमाळ जिल्हा परिषदेत विविध संवर्गासाठी पदभरती घेण्यात येत आहे. २ नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. मात्र औरंगाबाद येथे अटक झालेल्या ११ जणांच्या टोळक्यामुळे ही भरती प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. या आरोपींजवळ उत्तर तालिका सापडल्या आहेत. दहा ते पंधरा लाख रुपयांमध्ये उमेदवारांना ही उत्तरतालिका परीक्षेपूर्वीच देण्यात आली.
सुमारे ४० जणांना ही उत्तर तालिका विकण्यात आल्याची कबुली अटकेतील विक्रीकर निरीक्षकासह ११ जणांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह आणि आर्थिक गुन्हे शाखेपुढे दिली. अद्याप या आरोपींनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव उघड केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या जिल्हा निवड समितीतील सदस्यांपैकी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वातील पथक मंगळवारी सकाळी ११ वाजता यवतमाळात दाखल झाले.
त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या निवासस्थानी जावून त्यांची तब्बल दीड तास चौकशी केली. जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा प्रक्रियेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.
१ नोव्हेंबरला आपण स्वत: विविध संवर्गातील पदांच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या. या प्रश्नपत्रिका जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कक्षात एका खासगी झेरॉक्स व्यावसायिकाकडून मशीन आणून प्रिंट काढल्या.
त्यानंतर दोन स्वीय सहायक आणि शिपायांच्या मदतीने त्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या. त्यामुळे या घटनेत जिल्हा निवड समितीचा कुठलाही सहभाग नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सावंत यांनी ते दोन स्वीय सहायक, शिपाई आणि झेरॉक्स व्यावसायिक यांची नावे, मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला. तसेच या पाच जणांना चौकशीसाठी वेळोवेळी औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस बजावली, अशी माहिती मधुकर सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सतीश येटरे ल्ल यवतमाळ

औरंगाबादपासून १८ कि़मी. अंतरावर असलेल्या लाडेगाव टोल नाक्यावर सिनेस्टाईल चार वाहने ताब्यात घेऊन खामनकर याच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली. यावेळी वाहनात १८ लाखांची रोकड आणि उत्तरतालिका विक्री झालेल्या ४० उमेदवारांच्या नावाची यादी पोलिसांनी जप्त केली. या चाळीसही उमेदवारांना साक्षीदार नव्हे तर आरोपी बनविले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Yavatmal District Collector inquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.