यवतमाळची तंबाखूमुक्ती चळवळ लिम्का बुकात
By admin | Published: October 31, 2016 09:50 PM2016-10-31T21:50:10+5:302016-10-31T21:50:10+5:30
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. तंबाखूचे व्यसन सोडण्याबाबत ३१ डिसेंबर २०१५ रोजी साडेतीन लाख नागरिकांनी एकाच वेळी शपथ घेतली.
Next
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">
अविनाश साबापुरे / ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 31 - गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. तंबाखूचे व्यसन सोडण्याबाबत ३१ डिसेंबर २०१५ रोजी साडेतीन लाख नागरिकांनी एकाच वेळी शपथ घेतली. या विक्रमी उपक्रमाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून तंबाखूमुक्त अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक तंबाखू सेवन करणार नाही, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. सोबतच शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि त्यासोबतच गावकºयांनी तंबाखू सोडावा यासाठी ३१ डिसेंबर २०१५ रोजी या अभियानांतर्गत सामूहिक शपथ घेतली गेली. जिल्ह्यात एकाच वेळी साडेतीन लाख नागरिकांनी शपथ घेतली. ही घटना लिम्का बुकात विक्रम म्हणून आता नोंदविली गेली आहे.
शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, असे न्यायालयाचे आणि शासनाचे निर्देश आहेत. तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी ११ निकष ठरविण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात त्यादृष्टीने प्रयत्न होत असले तरी यवतमाळ जिल्ह्यात या अभियानाला अधिक गती मिळाल्याचे सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिलाणकर यांनी सांगितले. चळवळीची नोंद लिम्का बुकात झाल्याबद्दल वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांना पत्र पाठवून दखल घेतली. लवकरच यवतमाळ जगातील पहिला तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा ठरेल, अशी आशा त्या व्यक्त करण्यात आली आहे.
यवतमाळमधील शाळा मोठ्या प्रमाणात तंबाखूमुक्त होत आहे. मात्र, त्यांची त्रिस्तरीय तपासणी केली जात आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी, सलाम मुंबई फाऊंडेशनचे अधिकारी आणि अन्य समाजसेवी संघटनेचे कार्यकर्ते अशा तीन पातळीवर सर्व शाळांचे मूल्यमापन केले जात आहे. येत्या बालकदिनी १४ नोव्हेंबरला संपूर्ण जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.
अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात तंबाखूमुक्त जीवन संकल्प दिन साजरा करण्यात आला. त्याची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्डच्या २०१७ च्या मेडिकल सायन्स चॅप्टरकरिता झाली आहे. या संदर्भात लिम्काच्या संपादक आरती सिंग यांचा मेल प्राप्त झाला आहे.
- अजय पिलाणकर, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, सलाम मुंबई फाऊंडेशन