यवतमाळमध्ये कृषी अधिकारी कार्यालयात मनसेची तोडफोड, १९ शेतक-यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:13 AM2017-10-12T03:13:53+5:302017-10-12T03:14:13+5:30
कीटकनाशके फवारणीत १९ शेतक-यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी यवतमाळात उग्र आंदोलन केले.
यवतमाळ : कीटकनाशके फवारणीत १९ शेतक-यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी यवतमाळात उग्र आंदोलन केले.
मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषीविकास अधिकारी कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वळविला. तेथे अधीक्षकांची खुर्ची कार्यालयाबाहेर भिरकावली. ही खुर्ची जाळण्याची तयारी सुरू असतानाच पोलीस पोहोचल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर बुधवारी यवतमाळात आले होते. त्यांनी विषबाधित रुग्णांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नांदगावकर यवतमाळातून रवाना होताच कार्यकर्त्यांनी कृषीविकास अधिकारी कार्यालयावर धडक दिली.