यवतमाळचे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात ‘टॉप टेन’मध्ये
By admin | Published: August 10, 2014 01:57 AM2014-08-10T01:57:06+5:302014-08-10T01:57:06+5:30
यवतमाळचे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) महाराष्ट्रात ‘टॉप टेन’मध्ये असल्याची मोहोर उमटविली आहे.
Next
>यवतमाळ : अमेरिकेतील संस्थेने भारतातील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सव्रेक्षण केले असून, त्यात यवतमाळचे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) महाराष्ट्रात ‘टॉप टेन’मध्ये असल्याची मोहोर उमटविली आहे.
अमेरिकेतील रॅन्ड कार्पोरेशन या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेने राष्ट्रीय स्तरावर हे सव्रेक्षण अलीकडेच केले. त्यात दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला देशातून 177वा, राज्यातून दहावा तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पहिला क्रमांक देण्यात आला आहे.
1947पासून कार्यरत असलेल्या रॅन्ड कार्पोरेशन या संस्थेतर्फे जगभरात विविध क्षेत्रत संशोधन आणि सव्रेक्षण केले जाते. या संस्थेने देशभरातील एक हजार अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विविध पैलूंचा अभ्यास करून आपले निष्कर्ष नोंदविले आहेत.
सव्रेक्षणाचे परीक्षण आयआयई स्टॅनफोर्ड विद्यापीठ यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थेतील तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. यानुसार जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला देशातून 177वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
रॅन्ड कार्पोरेशन संबंधित क्षेत्रसाठी गुणवत्ता व उत्कृष्टतेचे परिमापक ठरविते. या सव्रेक्षणाची क्रमवारी देशात अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या ‘एज्यु टेक’ या नियतकालिकात प्रकाशित केली जाते. हे नियतकालिक उच्च तंत्रशिक्षणतज्ज्ञ प्रकाशित करतात.
मे-जून 2क्14च्या अंकात देशातील अभियांत्रिकी शिक्षण देणा:या प्रमुख 225 संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) सह देशातील सर्व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि राष्ट्रीयस्तरावरील बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टक्नॉलॉजी, पिलानी (बिटस्) यासारख्या प्रमुख संस्थांचा समावेश आहे.
‘एज्यु रॅन्ड रँकिंग’ सव्रेक्षण हे अभियांत्रिकी शिक्षण देणा:या संस्थाच्या गुणवत्तेचे विविध पैलू प्रकाशित करते. यात पीएच.डी.धारक प्राध्यापकांची संख्या आणि त्यांनी प्रकाशित केलेले संशोधन साहित्य, महाविद्यालयाला प्राप्त असलेल्या अॅक्रिडेशन्स (एनबीए) तसेच महाविद्यालयात दिले जाणारे दज्रेदार शिक्षण, परिसर मुलाखतीद्वारे नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी आदी बाबींचा यात समावेश असतो. या यशाबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
आंतरराष्ट्रीय दखल भूषणावह - विजय दर्डा
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली गेली असून, ही बाब संस्थेसाठी भूषणावह आहे, अशी प्रतिक्रिया जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणास्नेत खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. यानिमित्त त्यांनी शुक्रवारी महाविद्यालयाला भेट देऊन सर्वाचे अभिनंदन केले.
विद्याथ्र्याना निवड करणो सोयीचे
सव्रेक्षणाची संपूर्ण माहिती 666.स्र्रू‘-ं-ू’’ीॅी.ूे आणि ‘एज्यु टेक’ या नियमितकालिकाच्या 666.ी4ि-’ींीि12.ूे या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. एज्यु टेकने दिलेल्या रँकिंग क्रमवारीमुळे विद्याथ्र्याना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेताना योग्य महाविद्यालयाची निवड करण्यास मदत होते.