यवतमाळच्या तरुणाची चीनी मित्राशी लग्नगाठ; नामांकीत हॉटेलात रंगला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:14 AM2018-01-12T01:14:01+5:302018-01-12T01:16:49+5:30

येथील एका तरुणांने चक्क चीनमधील त्याच्या मित्राशी विवाह केला. स्टेट बँक चौकातील एका नामांकीत हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. या विवाहाने यवतमाळकर अचंबित झाले आहेत.

Yavatmal's youth married a Chinese friend; The ceremony will be celebrated in the hotel | यवतमाळच्या तरुणाची चीनी मित्राशी लग्नगाठ; नामांकीत हॉटेलात रंगला सोहळा

यवतमाळच्या तरुणाची चीनी मित्राशी लग्नगाठ; नामांकीत हॉटेलात रंगला सोहळा

Next

यवतमाळ : येथील एका तरुणांने चक्क चीनमधील त्याच्या मित्राशी विवाह केला. स्टेट बँक चौकातील एका नामांकीत हॉटेलच्या परिसरात ३० डिसेंबरच्या रात्री हा समारंभ पार पडला. या विवाहाने यवतमाळकर अचंबित झाले आहेत.
यवतमाळातील ऋषिकेश साठवणे गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये (अमेरिकेत) स्थायिक झाला आहे. तेथील ग्रीनकार्डही त्याला मिळालेले आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीत तो महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. त्याचे कुटुंबीय मात्र यवतमाळातच आहेत. या यवतमाळकर तरुणाला चीनमधील ‘व्हिन’ नामक तरुण आवडला. सुरुवातीला ओळख, नंतर मैत्री आणि शेवटी त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले.
आईवडील यवतमाळात आहेत, म्हणून लग्नही येथेच करण्याचे ऋषिकेशने ठरवले. ३० डिसेंबरला जोडपे येथे आले. ‘गेट टू गेदर’ करायचे असे सांगून हॉटेल बुक करण्यात आले आणि सायंकाळी धुमधडाक्यात लग्न उरकले. या समारंभाला यवतमाळातील क्वचितच कोणी उपस्थित होते. मात्र, अमेरिका, चीनमधून ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता. दुसºया दिवशी या समलिंगी विवाहाची वार्ता कळताच सर्वसामान्य यवतमाळकरांनी मात्र तोंडात बोटे घातली. मात्र तोवर हे नवपरिणित दाम्पत्य निघून गेले होते. दरम्यान, आमच्या हॉटेलमध्ये फक्त गेट टू गेदर झाले. लग्न झाले का, याविषयी माहिती नसल्याचे संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आईचा विरोध झुगारला
या समलिंगी विवाहाला ऋषिकेशच्या आईचा विरोध होता. मात्र, मुलाच्या मर्जीपुढे तिचे काही चालले नाही. लग्नापूर्वी या समलिंगी जोडप्याने यवतमाळातील चार-पाच प्रतिष्ठितांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचेही कळते. हॉटेलमधील समारंभात या समलिंगी जोडप्याला हळद लावून, अंतरपाट धरून रितसर वैदिक पद्धतीने विवाह करण्यात आला.

Web Title: Yavatmal's youth married a Chinese friend; The ceremony will be celebrated in the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.