यंदा ४५ टक्के पाणीसाठा अधिक

By admin | Published: August 31, 2016 01:19 AM2016-08-31T01:19:02+5:302016-08-31T01:19:02+5:30

पुणे जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये आजअखेर ८६.८१ टक्के म्हणजेच १८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पावसाच्या दडीमुळे याच सुमारास हे प्रकल्प केवळ ४१ टक्के भरले होते.

This year, 45 percent more water storage | यंदा ४५ टक्के पाणीसाठा अधिक

यंदा ४५ टक्के पाणीसाठा अधिक

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये आजअखेर ८६.८१ टक्के म्हणजेच १८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पावसाच्या दडीमुळे याच सुमारास हे प्रकल्प केवळ ४१ टक्के भरले होते. त्या तुलनेत या पावसाळ्यात सर्व धरणांमध्ये मिळून ४५ टक्के पाणीसाठा अधिक आहे.
पुणे जिल्ह्यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला हे धरण प्रकल्प मुठा खोऱ्यात, तर पवना, कासारसाई, मुळशी, कळमोडी, चासकमान, आंद्रा, भामा आसखेड, वडीवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर हे १२ प्रकल्प नीरा खोऱ्यात समाविष्ट आहेत. नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे आणि घोड हे प्रकल्प कुकडी नदीच्या खोऱ्यात आहेत. विसापूर आणि उजनी हे प्रकल्प भीमा खोऱ्यात आहेत.
या सर्व धरणांची साठवण क्षमता २१५.३१ अब्ज घनफूट (टीएमसी) असून, आजअखेर या धरणांमध्ये ५२९१.६८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८६.९२ टीएमसी (८६.८१ टक्के) पाणी आहे. २५ पैकी १३ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाचे घटत जाणारे प्रमाण पाहता व उष्णतेचे वाढत जाणारे प्रमाण व पाणी वापर पाहता यापेक्षा अधिक साठा होण्याची शक्यता कमी आहे.
सर्वाधिक पावसाच्या जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण पाहता २०१३ मध्ये धरणांमध्ये सर्वाधिक ९७ टक्के पाणीसाठा असल्याचे दिसून येते. २०१२ पासूनच्या ४ वर्षांची तुलना केली असता : २०१५ व २०१२ या दोन वर्षांमध्ये आॅगस्टअखेरीस धरणांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी चिंताजनकच होती. २०१२ मध्ये ५८.८८, २०१५ मध्ये ४१.०५ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये होता. २०१४ मध्ये ८८.२१ टक्के पाणीसाठा होता.
सर्वाधिक साठवण क्षमता (५३ टीएमसी) असलेल्या उजनी प्रकल्पात आजमितीस ६१ टक्के पाणीसाठा असून, दोन वर्षांनंतर या धरणात निम्म्यापेक्षा अधिक साठा असल्याने समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: This year, 45 percent more water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.