कार्तिकी वारीवर यंदा ९० कॅमेऱ्यांची नजर

By Admin | Published: November 7, 2016 06:15 AM2016-11-07T06:15:14+5:302016-11-07T06:15:14+5:30

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीने ९० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़

This year, 90 kyadira watch Kartiki warrior | कार्तिकी वारीवर यंदा ९० कॅमेऱ्यांची नजर

कार्तिकी वारीवर यंदा ९० कॅमेऱ्यांची नजर

googlenewsNext

पंढरपूर (जि. सोलापूर) : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीने ९० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़ त्यापैकी ६५ हे कायमस्वरुपी, तर २५ तात्पुरते आहेत. तसेच मंदिरात आणि संत तुकाराम भवन असे दोन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत़
कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़ सर्व भाविकांना शिस्तीबद्धपणे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि तेथून स्कायवॉक अशी दर्शन रांगेची सोय केली आहे़ शिवाय मंदिर समितीचे कायमस्वरूपी चार पत्राशेड असून, आता यात्रा कालावधीसाठी तात्पुरते पाच पत्राशेड उभारण्यात आले आहेत़ या ठिकाणी दर्शन रांगेत घुसखोरी, धक्काबुक्की, चोरी, भाविकांना भोवळ येणे, अशा घटना घडतात. त्यावर सीसीटीव्हीची नजर असेल़ दर्शन रांगेत असा प्रकार होताना आढळल्यास नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होणार आहे़
विशेष म्हणजे यंदा चंद्रभागा वाळवंटातील घडामोडी टिपण्यासाठी महाद्वार घाटावरील हायमास्ट दिव्यावर ‘फोकल लेंथ’चे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ तेथे ते कायमस्वरुपी असतील़ या कॅमेऱ्यामुळे चंद्रभागा पात्रातील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे़ तसेच नदीपात्रातून होणारा बेकायदा वाळू उपसा रोखण्यास मदत होणार आहे़ (प्रतिनिधी)

एलईडी
स्क्रीनवरून दर्शन
ज्या भाविकांना रांगेतून पददर्शन घेणे शक्य होणार नाही, ते भाविक नामदेव पायरी, कळस दर्शन घेतात़ यंदा नामदेव पायरी येथे मोठी एलईडी स्क्रिनद्वारे पांडुरंगाच्या दर्शनाची सोय मंदिर समितीने केली आहे़ नामदेव पायरी दर्शन घेतानाच एलईडी स्क्रीनवरून पांडुरंगाचे दर्शन मिळणार आहे़

Web Title: This year, 90 kyadira watch Kartiki warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.