यंदा देशभरात चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाचाही अंदाज
By admin | Published: April 12, 2016 04:26 PM2016-04-12T16:26:58+5:302016-04-12T18:53:24+5:30
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात बळीराजाच्या मदतीला पाऊस धाऊन येणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थे पाठोपाठ सरकारी हवामान विभागाने वर्तवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात बळीराजाच्या मदतीला पाऊस धाऊन येणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थे पाठोपाठ सरकारी हवामान विभागाने वर्तवला आहे. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना या अंदाजाने शेतक-यांना नक्कीच आशेची पालवी फुटणार आहे.
सलग दोनतीन वर्ष दुष्काळ सोसणाऱ्या जनतेला हा मोठा दिलासा आहे. विदर्भ, मराठवाड्यालाही गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. आज भारतीय हवामान विभागाने देशातील पर्जंन्यसंबधी पत्रकार परिषद घेऊन ही माहीती दिली.