यंदा ‘कट आॅफ’ घसरला

By admin | Published: July 12, 2017 05:01 AM2017-07-12T05:01:24+5:302017-07-12T05:01:24+5:30

गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार, यंदाही अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केली

This year the cut-off dropped | यंदा ‘कट आॅफ’ घसरला

यंदा ‘कट आॅफ’ घसरला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार, यंदाही अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केली आहे. सोमवारी रात्री उशिराने जाहीर झालेल्या अकरावीच्या पहिल्या यादीत नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ हा नव्वद टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदाचा कटआॅफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन टक्क्यांनी घसरला. अकरावीच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत दीड लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतिक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजता पहिली यादी जाहीर होणार होती. पण नायसा कंपनीने दुपारपासून काम सुरू करूनही ते वेळेत पूर्ण केले नाही. डेटा अपलोड झाला नसल्याने शेवटी रात्री १ वाजता आॅनलाइन यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ३६ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. यापैकी पहिल्या यादीत १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. काही नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ ९४ टक्के इतका आहे. यंदा तिन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने कटआॅफचा नवीन उच्चांक स्थापित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण तसे झाल्याचे दिसून आले नाही. अनेक विद्यार्थ्यांनी रुईया, झेविअर्स, एन.एम.सारख्या महाविद्यालयांना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. एकीकडे पहिल्या यादीत प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक असणाऱ्या ७५ ते ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही पहिल्या यादीत क्रमांक लागला आहे. यंदा कोट्यातील जागांवर थेट झालेले प्रवेश, एसएससी निकालात ९० हून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या याचा परिणाम यादीवर झाला.
>विद्यार्थ्यांनी रात्र जागून काढली : दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांचे १० जुलैला सायंकाळी जाहीर होणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. सोमवारी सायंकाळपासून विद्यार्थी आणि पालक यादीकडे डोळे लावून बसले होते. दुपारपासून कंपनीने डेटा अपलोड करण्याचे काम सुरू केले. पण डेटा अपलोड होत नव्हता. त्यामुळे अखेर रात्री साडेबारानंतर सर्व डेटा अपलोड करण्यात कंपनीला यश आल्यानंतर रात्री १ वाजता पहिली यादी जाहीर झाली.
>५३ हजार जणांना मिळाली पहिली पसंती
पहिल्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ हजार ८०३ इतकी आहे. तर दुसरा पसंतिक्रम दिलेले महाविद्यालय २५ हजार ९५० विद्यार्थ्यांना मिळाले.
तिसऱ्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय १८ हजार २९२ आणि चौथ्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय १४ हजार ३१२, तर पाचव्या क्रमांकाचे पसंतिक्रमाचे महाविद्यालय ११ हजार ८८७ विद्यार्थ्यांना मिळाले आहे.
शाखानिहाय विद्यार्थी
कला - १५,९१२
विज्ञान - ४७,४२७
वाणिज्य - ९२,०८३
एमसीव्हीसी - १,०८५
(द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी)
एकूण - १,५६,५०७
कोटा प्रवेश
व्यवस्थापन - १,५३१
इनहाउस - ११,२९९
अल्पसंख्याक - १९,५७४
एमसीव्हीसी - ७३
एकूण कोटा प्रवेश - ३२,४७७
महाविद्यालयांमधील शाखानिहाय पहिली यादी
कला
महाविद्यालय कटआॅफ
सेंट झेवियर्स ९४
रामनिवास रुईया९०.६
जय हिंद ८९.८
वझे - केळकर ८३.८
मिठीबाई ८३.८
रूपारेल ८२.८
विल्सन ७८.२
बिर्ला ७७.६
वाणिज्य
महाविद्यालय कटआॅफ
एच.आर. ९१.४
जोशी-बेडेकर९०.४०
वझे - केळकर ८९.६
जय हिंद ८९.४
केसी८८.८०
एम. एल. डहाणूकर ८८.४
रूपारेल ८७.५७
साठे८६.२
विज्ञान
महाविद्यालय कटआॅफ
रामनिवास रुईया९२.८०
वझे- केळकर ९२.६
बांदोडकर९२.४
रुपारेल ९१.२
सेंट झेवियर्स ८९.८
के.सी.८५.४०
मिठीबाई ८५.१७
जयहिंद ८४.६

Web Title: This year the cut-off dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.