यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:13 AM2020-07-17T05:13:37+5:302020-07-17T06:49:56+5:30

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली.

This year too, the girl is number one! Twelfth result 90.66%, Konkan division tops | यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल

यंदाही मुलीच नंबर वन! बारावीचा निकाल 90.66%, कोकण विभाग अव्वल

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१८ टक्के लागला. गेल्या वर्षी ८५.८८ निकाल लागला होता. मात्र, यंदा निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे.

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेतली. परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. परंतु, सर्व अडचणींवर मार्ग काढतात मंडळाने निकाल जाहीर केला.

निकालाची वैशिष्ट्ये मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ५.८४ टक्क्यांनी अधिक
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.५७ टक्के
बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या १५४ विषयांच्या परीक्षेपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्के
खासगीरित्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकाल ७२.०८ टक्के
१६,७२० विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण १,४३,४४१ विद्यार्थ्यांनी मिळविले.

शाखानिहाय २ वर्षांचा निकाल
शाखा २०१९ २०२०
विज्ञान ९२.६० ९६.९३
कला ७६.४५ ८२.६३
वाणिज्य ८८.२८ ९१.२७
व्यवसाय अभ्यासक्रम ७८.९३ ८६.०७

यंदा कोरोनामुळे उत्तरपत्रिका संकलनाचा मोठा प्रश्न होता. ‘रेड झोन’ असल्यामुळे शिक्षकांच्या घरून संकलन करावे लागले. त्यासाठी कर्मचाऱ्यांसोबत विभागीय मंडळाचे अध्यक्ष
व सचिव स्वत: फिरत
होते.
- शकुंतला काळे, अध्यक्ष,
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

 

Web Title: This year too, the girl is number one! Twelfth result 90.66%, Konkan division tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.