यंदा झाला रेकॉर्ड ब्रेक मान्सून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:40 AM2019-09-27T03:40:28+5:302019-09-27T06:46:49+5:30

देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचा धिंगाणा सुरू असून, आता मान्सून कोकण आणि गोव्यातही विक्रम नोंदविण्याच्या मार्गावर आहे.

This year was a record break monsoon | यंदा झाला रेकॉर्ड ब्रेक मान्सून

यंदा झाला रेकॉर्ड ब्रेक मान्सून

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : देशभरात ठिकठिकाणी मान्सूनचा धिंगाणा सुरू असून, आता मान्सून कोकण आणि गोव्यातही विक्रम नोंदवण्याच्या मार्गावर आहे. स्कायमेटकडील माहितीनुसार, १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत येथे सरासरी २,९१५ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ४ हजार २९८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस ५३ टक्के अधिक आहे.

कोकण, गोव्यात सर्वाधिक पावसाची नोंद केली जाते. कर्नाटकनंतर गोव्यासह कोकणात पाऊस दुसऱ्या क्रमांकावर असतो. जून ते सप्टेंबर या हंगामात कर्नाटकात सरासरी ३,१७४ मिमी पाऊस पडतो. तर कोकण, गोव्यात २,९१५ मिमी पाऊस पडतो. मान्सूनच्या या हंगामात पाऊस कोकण, गोवा विभागात विक्रम नोंदविण्याच्या मार्गावर आहे.

येथे सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबई, डहाणू, अलिबाग, हर्णे, रत्नागिरी आणि महाबळेश्वर या जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. हर्णे वगळता उर्वरित सर्व ठिकाणांनी सप्टेंबरमधील पावसाच्या १० वर्षे जुन्या विक्रमाला मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, असे स्कायमेटचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांतील परतीच्या पावसाच्या तारखा
वर्ष     दिनांक
२०१०    २७
२०११    २३
२०१२    २४
२०१३     ९
२०१४    २३
२०१५     ४
२०१६    १५
२०१७    २७
२०१८    २९

पावसाचे प्रमाण (टक्क्यांत) १ जून ते २६ सप्टेंबर, २०१९
मुंबई ३५
ठाणे ७०
पालघर ६९
रायगड ५८
रत्नागिरी ४८
सिंधूदुर्ग ४६
नाशिक ६९
धुळे ८२
नंदुरबार ५७
अहमदनगर २५
पुणे ११४
सातारा ६४
सांगली ३२
कोल्हापूर ७१
सोलापूर ३७
उस्मानाबाद १४
बीड २५
लातूर २२
औरंगाबाद ५
जालना १०
जळगाव ३६
बुलडाणा १
परभणी १५
हिंगोली १७
अकोला १४
नांदेड १
वाशिम २२
यवतमाळ ३०
अमरावती १
वर्धा ८
चंद्रपूर १६
नागपूर २५
भंडारा ४
गोंदिया ६
गडचिरोली ४७

Web Title: This year was a record break monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस