यंदा १५ दिवस आधीच पाणीटंचाई
By admin | Published: May 2, 2016 12:43 AM2016-05-02T00:43:52+5:302016-05-02T00:44:35+5:30
दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे तसतशी पाण्याची पातळी देखील जलदगतीने घटत आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्रोतच आटल्याने संगमेश्?वर तालुक्यामध्ये पाणीटंचाईची भीषणता
- सचिन मोहिते, देवरुख
दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे तसतशी पाण्याची पातळी देखील जलदगतीने घटत आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्रोतच आटल्याने संगमेश्?वर तालुक्यामध्ये पाणीटंचाईची भीषणता जाणवू लागली आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संगमेश्?वर तालुक्यामध्ये गतवषीर्चा विचार केल्यास १ एप्रिलपासून तब्बल १५ दिवस आधीच टँकर सुरु झाला आहे. यावर्षी पाणीटंचाई किती भीषण आहे, हे स्पष्ट होत आहे.
तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर १ एप्रिलला पाणीटंचाईग्रस्त गावातील वाड्यांंमध्ये टँकर धावू लागला. या दिवसापासून सहा गावांतील १0 वाड्यांना केवळ एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. हा शासकीय टँकर १ दिवस आड करुन त्या-त्या वाडीत जात होता. मात्र, ज्या वाडीची लोकसंख्या ३५ आहे आणि ज्या वाडीची लोकसंख्या १00 पेक्षा अधिक आहे तेथेदेखील केवळ एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
संगमेश्वर तालुक्याच्या कृती आराखड्यामध्ये २८ गावांमधील ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, सध्या पाणीटंचाईची भीषणता दिवसागणिक वाढत आहे. तहानलेल्या जनतेला केवळ एकाच शासकीय टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे.
संगमेश्वर तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता बहुतांशी गावे ही डोंगरदऱ्यांमध्ये वसली आहेत. त्यामुळे डोंगर माथ्यावर असणाऱ्या वाड्या-वस्त्यांना या पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागतो. डोंगराळ भागातील पाण्याचे स्रोत हे उन्हाळ्यात कोरडे होतात. तसेच तालुक्यातील नद्या, नाले हे गाळात रुतल्यामुळे पाण्याची पातळी देखील कमी होते.
प्रतिवर्षी उन्हाळा लागण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बनवला जातो. मात्र, पाण्याचे साठे व स्रोत बळकट करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. अशा उपाययोजनांकडे लोकप्रतिनिधी आणि टंचाईग्रस्त गावात मोडणाऱ्या जनतेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आजपर्यंत नळपाणी योजनांसाठी कितीतरी वारेमाप पैसा खर्च झाला. मात्र, त्या नळपाणी योजना कितपत यशस्वी ठरल्या हा संशोधनाचा विषय आहे.
१ एप्रिलपासून एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या गावांमध्ये पाचांबे गावातील जखीनटेप, मेढे आणि नेरदवाडीतील ग्रामस्थांसाठी ६ फेऱ्या, पुर्ये तर्फे देवळे गावातील गवळीवाडी, धनगरवाडीतील ग्रामस्थांसाठी टँकरच्या ५ फेऱ्या, बेलारी खुर्द, माची धनगरवाडी, कळंबटेवाडी प्रत्येकी वाडीला ५ व
४ फेऱ्या, कनकाडी गावातील खालची गुरववाडी २ फेऱ्या, कातुडीर्कोंड
४ फेऱ्या आणि ओझरे खुर्द माळवतवाडी ४ फेऱ्या या फेऱ्या २२ एप्रिलपर्यंत मारण्यात आल्या होत्या.
संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांना २५ तारखेपर्यंत एकाच टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. मात्र, आता २६ तारखेपासून दुसरा शासकीय टँकर उपलब्ध झाला आहे.
संगमेश्वर तालुक्यात सुमारे १३ लघु व मध्यम धरणे पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आली
असली, तरी देखील तालुक्यातील २८ गावांतील ३६ ते ४0 वाड्यांतील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ््यात
पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
पाणी टंचाईग्रस्त गावातून पाण्यासाठी टँकरची मागणी वाढली की, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पाणीपुरवठा विभाग या तिघांची संयुक्त पाहणी झाल्यावरच टँकर सुरु करण्याबाबत अहवाल तयार होऊन टँकर सुरु होतो. मात्र, ही
पाहणी करण्याची जबाबदारी
एकाच विभागाकडे असावी,
अशी मागणी होताना दिसत आहे.
२७ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा
तालुक्यामध्ये सध्या १८ गावांतील ३६ वाड्यांमधून टँकर चालू होण्यासाठी प्रस्ताव प्रशासन स्तरावर आले आहेत. यातील ६ गावे आणि ९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
लोकमत विशेष पाचांबे, पुर्येतर्फ देवळे, बेलारी खुर्द, कनकाडी, कातुडीर्कोंड आणि ओझरे खुर्द यांचा यामध्ये समावेश आहे. अद्याप २७ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे.
या एकूण १८ गावांमध्ये बेलारी खुर्द, शृंगारपूर पाचांबे, तुरळ, पुर्येतर्फे देवळे, उजगाव, दाभोळे, कनकाडी, निगुडवाडी, माभळे, निवेखुर्द, भडकंबा, तळवडेतर्फे देवरुख, ओझरे खुर्द, शेणवडे, कुटगिरी, राजवाडी, भिरकोंड या वाड्यांचा समावेश आहे.