यंदा २५ जून रोजी सर्वांत मोठी भरती
By admin | Published: May 11, 2017 02:59 AM2017-05-11T02:59:21+5:302017-05-11T02:59:21+5:30
समुद्राच्या उधाण भरतीच्या वेळी मुंबई शहरात जर जोरात पाऊस पडला, तर पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे शहरातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समुद्राच्या उधाण भरतीच्या वेळी मुंबई शहरात जर जोरात पाऊस पडला, तर पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता असते. यंदा पावसाळ्यातील समुद्राच्या साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे दिवस, पूर्ण भरतीच्या वेळा आणि उधाण भरतीच्या पाण्याची उंची पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
२५ जून रोजी दुपारी समुद्रात सर्वात मोठी भरती असणार आहे. या वेळेस समुद्रात ४.९७ मीटर उंच लाटा उसळणार आहेत. २३ ते २८ जून या सहा दिवसांमध्ये समुद्रात ४.५ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. जुलै महिन्यात २२ ते २७ या सहा दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. यामध्ये २४ जुलै रोजी समुद्रात सर्वाधिक ४.८९ मीटर उंच लाटा उसळणार आहेत. आॅगस्ट महिन्यात २१ ते २४ या तीन दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. त्यात २२ आॅगस्ट रोजी समुद्रात सर्वात उंच ४.७५ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.
अशी असेल भरतीच्या पाण्याची पातळी -
१) शुक्रवार, २३ जून सकाळी ११-३४ वाजता ४.७१ मीटर
२) शनिवार, २४ जून दुपारी १२-२०वाजता ४.८९ मीटर
३) रविवार, २५ जून दुपारी १-०७ वाजता ४.९७ मीटर
४) सोमवार, २६ जून दुपारी १-५४ वाजता ४.९४ मीटर
५) मंगळवार, २७ जून दुपारी २-३९ वाजता ४.८१ मीटर
६) बुधवार, २८ जून दुपारी ३-२३ वाजता ४. ६० मीटर
७)शनिवार, २२ जुलै सकाळी ११-२० वाजता ४.६२ मीटर
८) रविवार, २३ जुलै दुपारी १२-०६ वाजता ४.८१ मीटर
९) सोमवार, २४ जुलै दुपारी १२-५० वाजता ४.८९ मीटर
१०) मंगळवार, २५ जुलै दुपारी १-३२ वाजता ४.८७ मीटर
११) बुधवार, २६ जुलै दुपारी २-१२ वाजता ४.७५ मीटर
१२) गुरुवार, २७ जुलै दुपारी २-५४ वाजता ४.५४ मीटर
१३) सोमवार, २१ आॅगस्ट सकाळी ११-४९ वाजता ४.६८ मीटर
१४) मंगळवार, २२ आॅगस्ट दुपारी १२-२८ वाजता ४.७५ मीटर
१५) बुधवार, २३ आॅगस्ट दुपारी १-०५ वाजता ४.७१ मीटर
१६) गुरुवार, २४ आॅगस्ट दुपारी १-४१ वाजता ४.५८ मीटर