येळळूरमध्ये पुन्हा दंडुकशाही

By admin | Published: September 22, 2015 09:56 PM2015-09-22T21:56:41+5:302015-09-22T23:31:30+5:30

कार्यकर्ते ताब्यात : कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र राज्य फलक काढला

Yehaloor again in Dandukshahi | येळळूरमध्ये पुन्हा दंडुकशाही

येळळूरमध्ये पुन्हा दंडुकशाही

Next

बेळगाव : येळ्ळूर गावातील एका गणेशोत्सव मंडळाने मंडपात लावलेला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक पोलिसांनी काढून पुन्हा एकदा दडपशाही केली आहे. तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले आहे.
विराट गल्ली येथील श्री छत्रपती व्यायाम शाळा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने मंडपात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा निषेध करणारा फलक लावला होता. त्यासोबत महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असा छोटा फलक आणि त्यावर भगवा ध्वज लावला होता. मंगळवारी हा फलक आणि फलक लावलेले वृत्त कळताच पोलिसांनी हा फलक आणि ध्वज काढून ताब्यात घेतला.
बेळगावसह सीमाभागातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये महाराष्ट्र राज्याचे फलक लावण्यात येतात. मात्र पोलिसांनी महाराष्ट्र राज्य हा फलक काढून मंडळाच्या कार्यकर्र्त्याना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. येळ्ळूर येथील गणेश मंडळाच्या युवक आणि ग्राम पंचायत सदस्य सतीश कुगजी यानी सांगितले, कानडी पोलिसांनी आमच्यावर केलेली कारवाई म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असो की भाजप-जनता दलाचे सरकार असो मराठी माणसाची गळचेपी होत आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे
गतवर्षी उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून येळ्ळूर येथील गावाच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक पोलिसांनी हटवला होता . त्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा फलक उभारल्यावर पोलिसांनी पुन्हा तो फलक जमीनदोस्त करून गावातील लोकांना अमानुष मारहाण केली होती . याविरोधात येळ्ळूर ग्रामस्थांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून आपल्यावरील अन्याय मांडला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्याची दाखल घेवून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत .
येळ्ळूर मधील पोलिसी अत्याचाराचे सल अद्यापही मराठी भाषिकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेकजणांनी यावर्षीही महाराष्ट्र येळ्ळूर फलक आपल्या घरातील गणपती समोर लावून देखावा सादर केला आहे
कारवाई च्या भीतीने घरातील देखावा काढला
बेळगाव शहरातील महाद्वार रोड मधील उम्ेश चौगुले या युवकाने आपल्या घरात कानडी पोलिसांनी येळळूरमध्ये मराठी भाषिकांना केलेली मारहाण हा हालता देखावा केला आहे. आज पोलिसांनी केलेल्या कारवाइमुळे निम्म्याहून अधिक घरातील देखावा काढण्यात आला आहे.

Web Title: Yehaloor again in Dandukshahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.