येळकोट येळकोट जय मल्हार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:07 PM2019-02-19T23:07:15+5:302019-02-20T00:28:40+5:30
चांदवड : येथील श्री राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव संपन्न झाला. यानिमित्त ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते शुक्रवारी घटस्थापना होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला .
चांदवड : येथील श्री राजमंदिर खंडोबा देवस्थानच्या वतीने माघी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव संपन्न झाला. यानिमित्त ट्रस्टचे संस्थापक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते शुक्रवारी घटस्थापना होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला .पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात पप्पू अहिरराव, नानाभाऊ शेळके (काळखोडे), सजन बागल, त्र्यंबक सानप (गुळवंच, सिन्नर), दत्तू पगार, खंडेराव सूर्यवंशी (शिऊर बंगला) या वाघे मंडळांचा जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. मंगळवार, दि. १९ रोजी ताईबाई मुरळी,
निवृत्तीअण्णा जेऊघाले, वामनराव बरकले, समाधान बागल, कैलास अहेरराव, चांदवडकर व इगतपुरी या वाघे मंडळाचा जागरण व गोंधळाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी हनुमान मंदिरापासून कावडी व रथाची मिरवणूक काढण्यात आली. रथाचा मान कैलास बाळासाहेब कोतवाल यांचा होता.
कावड मिरवणुकीत सिध्देश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. गाड्या ओढण्याचा मान सोपान नामदेव जाधव यांचा होता. यात्रोत्सव यशस्वितेसाठी अनिल माधव कोतवाल, आदित्य फलके, सचिन अग्रवाल, नंदकुमार भागवत कोतवाल, राहुल कोतवाल, सुभाष शेळके, रविकांत गवळी, पप्पू भालेराव, नारायण कोतवाल, आदेश शेळके, विशाल गवळी, गणेश गवळी, अरुण शिंदे, स्वप्नील महाले, श्याम सोनवणे, दिनकर अहिरे, सुनील कोतवाल व यात्रा पंचकमिटीने प्रयत्न केले.