ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:10 AM2023-04-04T06:10:17+5:302023-04-04T06:10:52+5:30

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना इशारा

Yellow alert for rain in summer | ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज

ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट, ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह राज्यभरातील जिल्ह्यांना एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा चटका बसेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असतानाच आता ७ एप्रिलपर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ४ एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर ५ एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

Web Title: Yellow alert for rain in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.