येळ्ळूरमध्ये ग्रामस्थांनी ‘तो’ फलक पुन्हा उभारला

By admin | Published: July 27, 2014 02:30 AM2014-07-27T02:30:16+5:302014-07-27T02:30:16+5:30

येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी अभूतपूर्व अस्मितेचे दर्शन घडवीत शनिवारी ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक पुन्हा उभा केला.

In Yellur, the villagers raised the 'bay' panel | येळ्ळूरमध्ये ग्रामस्थांनी ‘तो’ फलक पुन्हा उभारला

येळ्ळूरमध्ये ग्रामस्थांनी ‘तो’ फलक पुन्हा उभारला

Next
बेळगाव :  येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी अभूतपूर्व अस्मितेचे दर्शन घडवीत शनिवारी  ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक पुन्हा उभा केला. बेळगाव जिल्हा प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा फलक शुक्रवारी काढून टाकला होता; परंतु हा फलक 24 तासांच्या आत उभा करीत येळ्ळूरच्या ग्रामस्थांनी आपला ‘मराठी बाणा’ सिद्ध  करून दाखविला. दरम्यान, फलक हटविण्याची मागणी करण्यासाठी जनहित याचिका दाखल केलेल्या भीमाप्पा गडाद याच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले . 
लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी यांनी शुक्रवारी घेतलेली भूमिका पाहून जनतेनेच शुक्रवारी रात्नी फलक उभारण्याचा प्रय} केला; पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तो प्रय} यशस्वी झाला नाही. रात्नी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनीही दगडफेक केली. यानंतर येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी आज फलक उभारण्याचा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. फलक उभारणीचे काम पूर्ण होताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, येळ्ळूर येथील फलक हटविण्याच्या निषेधार्थ सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: In Yellur, the villagers raised the 'bay' panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.