होय, मीच केली आईची हत्या..., सिद्धांतची जोधपूरात कबुली

By admin | Published: May 26, 2017 04:00 AM2017-05-26T04:00:56+5:302017-05-26T04:11:07+5:30

‘होय, मीच केली आईची हत्या...’, अशी कबुली जोधपूरमधून ताब्यात घेतलेल्या सिद्धांतने दिली.

Yes, I did the murder of my mother ..., Jodhpura confession of theory | होय, मीच केली आईची हत्या..., सिद्धांतची जोधपूरात कबुली

होय, मीच केली आईची हत्या..., सिद्धांतची जोधपूरात कबुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘होय, मीच केली आईची हत्या...’, अशी कबुली जोधपूरमधून ताब्यात घेतलेल्या सिद्धांतने दिली. सांताक्रूझ येथे राहत्या घरात पोलीस पत्नी दीपाली गणोरे यांच्या हत्येनंतर होणाऱ्या तर्कवितर्कांना या वाक्याने पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून सिद्धांतला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू केली आहे.
सांताक्रूझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एजी पार्कमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गणोरे हे कुटुंबीयांसोबत राहतात. दीपाली यांनी परदेशातून एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले होते. त्या काही महिन्यांपूर्वीच मुंबईत आल्या होत्या. सिद्धांत अभ्यासात हुशार नसल्याने त्याला ऊठबस टोमणे मारणे सुरू होते. इंजिनीअरिंगमध्ये तो तीन वेळा नापास झाला. अखेर तेथून त्याला काढण्यात आले. त्यानंतर येथील नामांकित महाविद्यालयात तो बीएससीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मात्र मित्र इंजिनीअर झाले आणि आपण मागेच आहोत, या भावनेतून तो तणावात होता. शिवाय बीएससीचा अभ्यासही त्याला जमत नव्हता. अशात त्याने बीएससीची परीक्षा दिली नसतानाही परीक्षा दिल्याची थाप मारली होती. यावरून आई त्याच्यावर वैतागत असे. त्यात घरात आई आणि बाबांच्या भांडणाची भर. आईच्या रोजच्या वागणुकीला कंटाळून त्याने आईलाच संपविण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. 
मंगळवारी वडील कामावर गेल्यानंतर सिद्धांत आणि आई दीपाली घरात होते. अभ्यासावरून आईकडून ओरडा सुरू होता. त्यातूनच त्याने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या मानेवर सपासप वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्यानंतरही त्याचे वार सुरूच होते. त्याने तब्बल ९ वार केले. यावरच तो थांबला नाही. त्याने मृतदेहाशेजारी आईच्याच रक्ताने ‘टायर्ड आॅफ हर, कॅच मी अ‍ॅण्ड हँग मी’ (तिला कंटाळलो आहे. मला पकडा आणि फासावर लटकवा) असे लिहून पुढे स्माईली काढली. त्याच ठिकाणी चाकू ठेवला. त्यानंतर आंघोळ करून त्याने कपडे बदलले. कपाटातील सुमारे दोन लाख रुपये घेऊन तो पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपासात घटना घडल्यापासून बेपत्ता असलेल्या सिद्धांतवर पोलिसांचा संशय होता. त्याचा शोध सुरू असताना सिद्धांत बुधवारी रात्री मुंबईवरून जयपूरला पोहोचला. तेथे मुंबई पोलिसांची तीन पथकेरवाना झाली. तेव्हा तेथून तो जोधपूर येथील धूम हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी जोधपूर पोलिसांना सिद्धांतचा फोटो व्हॉट्सअ‍ॅप केला आणि त्याला ताब्यात घेण्याची विनंती केली. 
सकाळी दहा वाजेपर्यंत गणोरे घरातच होते. त्यानंतर ते कामावर गेले. मात्र तेथून १२ च्या सुमारास त्यांनी तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करत सीक लीव्ह घेतल्याची माहिती खार पोलिसांनी दिली. त्यामुळे तेथून ते पुढे कुठे गेले? आईच्या हत्येनंतर सिद्धांतने वडिलांना कळविले होते का? त्यानंतर गणोरेंनीच सिद्धांतला वाचवण्यासाठी त्याला मुंबईतून जयपूरला पाठविले का? अशा शक्यताही पडताळण्यात येत आहेत. 

आत्महत्या शक्य झाली नाही म्हणून ...
अभ्यासासाठी आईकडून येत असलेला दबाव, न दिलेल्या परीक्षेच्या रिपोर्ट कार्डसाठी आईकडून सुरू असलेल्या चौकशीला कंटाळून सिद्धांतने यापूर्वी दोन ते तीन वेळा स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ते शक्य न झाल्याने त्याने आईलाच संपविल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर येत आहे. सिद्धांतने बीएससीची परीक्षाच दिली नव्हती. याबाबत आईला संशय आला होता. चोरी पकडली गेली तर आईच्या रागाला सामोरे जावे लागेल, या भीतीने त्याने स्वत:लाच दोन ते तीन वेळा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो शक्य झाला नाही. 
मंगळवारी याच विषयावरून आई आणि सिद्धांतमध्ये वाद झाला. त्याने आईची हत्या केली. ेनंतर घरातील पैसे घेत वांद्रे टर्मिनस गाठले. तेथून तो सुरतला गेला. तेथे उभ्या असलेल्या जयपूर टे्रनमधून तो जयपूर स्टेशनला उतरला. स्टेशनजवळील मोबाइल दुकानातून त्याने मोबाइल आणि नवे सिमकार्ड विकत घेतले. त्यावरून त्याने मित्राला फोन करत मुंबईत काय चालले आहे, याची माहिती घेतली. याच दरम्यान त्याच्या मित्रांचे फोन टे्रसिंगवर होते. मित्रांकडून सिद्धांतची माहिती समजताच पोलिसांनी त्याच्या मोबाइल लोकेशनवरून शोध सुरू केला. तेव्हा तो तेथून जोधपूरला गेल्याचे समजले. 

मी कंटाळलो होतो
होय, मीच आईची हत्या केली आहे. त्याचे मला दु:ख नाही. ती स्वत:चाच विचार करणारी होती. तिला नेहमी असे वाटे की आम्ही तिच्याविरुद्ध काही कट करत आहोत. त्यामुळे आई-बाबांमध्ये भांडणे व्हायची. याला मी कंटाळलो होतो, अशी कबुली सिद्धांतने जोधपूर पोलिसांकडे दिली.

Web Title: Yes, I did the murder of my mother ..., Jodhpura confession of theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.