हो, मला नोटाबंदीचा फटका बसला - उद्धव ठाकरे

By admin | Published: February 12, 2017 08:18 PM2017-02-12T20:18:49+5:302017-02-12T20:39:59+5:30

नोटाबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला आहे. मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला कळेल असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.

Yes, I was hit with a knockout - Uddhav Thackeray | हो, मला नोटाबंदीचा फटका बसला - उद्धव ठाकरे

हो, मला नोटाबंदीचा फटका बसला - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अंधेरी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्य़ावर घणाघाती टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचार सभेत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

वाघाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, कधी पंजा मारेल ते समजणारही नाही. आम्ही मुंबईत शेर आहोत, आणि बाहेर पण आम्हीच शेर असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. पुढे बोलताना ते म्हणाले, इतकं निर्लज सरकार कधीच पाहिलं नाही. मला नोटाबंदीचा फटका बसला, कारण रांगेत ज्या लोकांचा मृत्यू झाला, हाच माझ्यासाठी मोठा फटका आहे. नोटाबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला. मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला कळेल असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे -

- मी मुख्यमंत्र्यांसारखा दगडाच्या हृदयाचा नाही
-मोहन भागवतांचं अभिनंदन ,त्यांनी देशभक्तीच्या विषयावर चांगलीच कानफाटात मारलीय
- मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला 23 तारखेला कळेल
- मला नोटाबंदीचा फटका बसला, कारण रांगेत जी लोकं मेली, हाच माझ्यासाठी मोठा फटका आहे - उद्धव ठाकरे
- कुत्र्याची छत्री आणि सेनेचं छत्र लोकांना चांगलं कळतं
- अशोक स्तंभावर अजून सिंहाचंच चित्र आहे, मोदींचं नाही

Web Title: Yes, I was hit with a knockout - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.