'होय मी कायदा मोडणार' - मनसे
By admin | Published: August 25, 2016 12:16 PM2016-08-25T12:16:49+5:302016-08-25T12:16:49+5:30
दहीहंडीची कमाल उंची २० फूट आणि १८ वर्षाखालील गोविंदांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - दहीहंडीची कमाल उंची २० फूट आणि १८ वर्षाखालील गोविंदांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे खुलेआम सर्रास उल्लंघन सुरु असून, यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर आहे.
ठाण्यात नौपाडा येथे मनसेने ४० फूट उंचीची हंडी उभारली असून, या हंडीला 'कायदेभंग' असे नाव दिले आहे. याच ठाण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'मी कायदा मोडणारच' असे टी-शर्ट परिधान करुन खुलेआम सर्वोच्च न्यालायचा आदेश धाब्यावर बसवल्याचा संदेश दिला आहे. मनसेच्या दहीहंडया जिथे आहेत तिथे मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
ठाण्यातील मनसेच्या नौपाडा येथील दहीहंडी फोडण्यासाठी आतापर्यंत २०० पेक्षा जास्त मंडळांनी नोंदणी केल्याचे आयोजन सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दहीहंडीच्या उंचीवर निर्बंध आणणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पत्रकारपरिषद घेऊन जाहीररीत्या कोर्टाच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. गोविंदा मंडळांनी हा आदेश पाळू नये असे आव्हान केले होते आता चित्रही तसेच दिसत आहे.
Thane (Maharashtra): An MNS worker wearing a t-shirt which reads "I will break the law". #DahiHandi#Janmashtamipic.twitter.com/QG7USlGiGk
— ANI (@ANI_news) August 25, 2016