'काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारलेला'; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:09 PM2023-06-12T12:09:24+5:302023-06-12T12:10:22+5:30

रविवारी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे.

Yesterday, Aurangzeb was among the police; Sanjay Raut's serious allegations against the Shinde-Fadnavis government on alandi wari | 'काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारलेला'; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

'काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारलेला'; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

googlenewsNext

गोंधळ होऊ नये म्हणून रविवारी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा संजय राऊत यांनी निषेध केला आहे. काल पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. काही बोगस आचार्य प्राचार्य काल तिथे बसले होते. त्यातून पोलिसांना वारकर्‍यांवर लाठीचार्ज करावा लागला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

पंढरीची वारी महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्या वारीवर आतापर्यंत कधी संकट आले नव्हते. आता हेच लोक विठोबाची पूजा करायला बसतील. काल वारकरी जखमी झाले, पळापळ झाली. ही सत्तेची मस्ती आहे, भाजप मस्ती दाखवायला जाते प्रत्येक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा, यासाठी काही टोळ्या आहेत, त्या काम करतात असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

धर्माभिमानी मुख्यमंत्री कुठे आहेत? फडणवीस कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कुठे आहेत? आता काढा मोर्चा असे आव्हान राऊत यांनी दिले. यामागे भाजपची टोळी आहे.  मागच्या वर्षीच बोलू नका, यावर्षीचे बोला, यावर्षी तुम्ही आहात ना गृहमंत्री मग का झाले असे? असा सवाल राऊतांनी फडणवीसांना केला आहे. 

भाजपाने या गोष्टीचा साधा धिक्कारही केला नाहीय. ते गुन्हा दाखल करणार नाहीत. आम्ही पोलिसांच्या बडतर्फिची मागणी केली आहे. निदान माफी तर मागा, नाही तर तुम्हाला आषाढीला पूजा करण्याचा अजिबात अधिकार नाही, असे राऊत म्हणाले. 
 

Web Title: Yesterday, Aurangzeb was among the police; Sanjay Raut's serious allegations against the Shinde-Fadnavis government on alandi wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.