Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:56 PM2024-11-23T15:56:29+5:302024-11-23T15:58:01+5:30
Yevla Assembly Election 2024 Result Live Updates : येवला विधानसभा मतदारसंघ हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो.
Yevla Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live नाशिक : विधानसभा निवडणुकीत राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांवर सर्वांची नजर आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ २६०५८ मतांनी विजयी झाले आहेत. छगन भुजबळ यांना १३१९४५ तर विरोधी हा विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांना १०५८८७ मते मिळाली आहेत.
येवला विधानसभा मतदारसंघ हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. महायुतीत अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवले होते. त्यामुळे येवला मतदारसंघात छगन भुजबळ पुन्हा बाजी मारणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर या मतदारसंघात छगन भुजबळ यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान, एकूण चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत छगन भुजबळांचे मताधिक्य मागील निवडणुकीपेक्षा कमी झालेले दिसून आले. या निवडणुकीत छगन भुजबळ यांना १३१९४५ मते मिळाली आहे. त्यांनी २६०५८ मतांनी विजय मिळवला आहे. तर विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांना १०५८८७ मते मिळाली आहेत.