योगा फिटनेस संघास विजेतेपद
By admin | Published: May 18, 2016 01:51 AM2016-05-18T01:51:17+5:302016-05-18T01:51:17+5:30
राज्य योगासन स्पर्धेत निगडी येथील पुणे जिल्हा योगा अॅण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट संघाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.
पिंपरी : राज्य योगासन स्पर्धेत निगडी येथील पुणे जिल्हा योगा अॅण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट संघाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. स्पर्धेत स्रेहल खोल्लम, रुपाली तरवडे, सुकेत शहा, सुशांत तरवडे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धा इगतपुरी, नाशिक येथे नुकतीच झाली. स्पर्धेत १५ जिल्ह्यांतील ३१० स्पर्धकांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण सुरेश गांधी, उमा चौगुले, डॉ. प्रज्ञा पाटील, चंद्रकांत पांगारे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात आला.
इन्स्टिट्यूट संघाचे विजयी खेळाडू :
१० वर्षे : वरद सुवर्णकार (तृतीय), ईशान देशमुख (चतुर्थ), तन्वी पाटील (तृतीय), आर्या गोगावले (चतुर्थ). १५ वर्षे : वरद तोटे (सहावा), समीक्षा महाले (तृतीय). २२ वर्षे : अवधूत गोगावले (सहावा), दिलीप परब (तृतीय), अर्चना निंबाळकर (चतुर्थ). ३० वर्षे : प्रमोद उगले (तृतीय), ओंकार गोसावी (पाचवा), स्रेहल खोल्लम (प्रथम). ४० वर्षे प्रौढ : प्रमोद कांबळे (तृतीय), राजेश ननावरे (सहावा), रुपाली तरवडे (प्रथम), योगिनी देशमुख (तृतीय), शर्मिला ननावरे (पाचवा). ५० वर्षे प्रौढ : बाबू ठाकूर (चतुर्थ), सुचिता खळदकर (पाचवा). ६० वर्षे प्रौढ : गोविंद शिरोळे (पाचवा), अरुणा आगरवाल (द्वितीय). ७० वर्षे प्रौढ : धनश्री रणनवरे (तृतीय). ७० वर्षांवरील प्रौढ : दादा ठाकूर (द्वितीय). (प्रतिनिधी)
थायबॉक्सिंग : राज्य संघ भूतानला रवाना
भूतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना झाला. काळेवाडी येथील पार्वती स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात संघाला आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शुभेच्छा दिल्या. संघात सुशांत देशमुख, वाणी गांजणे, प्रथमेश रुईकर, वृषभ बेलोकर (१४ वर्षे), सोहिल शेख, फहीम शब्बीर (१७ वर्षे), प्रियांषू सुतारे, नेहा सुतारे (१८ वर्षे), वैष्णवी मालखेडे, वैष्णवी गुजर, तृप्ती निबळे (१९ वर्षे) यांची निवड झाली आहे. चैताली छजलाने, जैद शेख, संतोष मिरगे यांची पंचपदी निवड झाली. या वेळी महाराष्ट्र थायबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष दस्तगीर मणियार, पी. वाय. अत्तार, श्रीधर गायकवाड, सुभाष दाभाडे, योगेश खराडे, अशोक सुतारे आदी उपस्थित होते. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.