मुंबई पोलिसांना योगासनाचे धडे !
By admin | Published: December 28, 2015 03:46 AM2015-12-28T03:46:00+5:302015-12-28T03:46:00+5:30
मुंबई पोलिसांना निरोगी व दीर्घायुषी जीवनासाठी त्यांना योगतज्ज्ञांकडून योगासनाचे धडे ‘योगा बाय द बे’ या कार्यक्रमातून देण्यात आले.
मुंबई : मुंबई पोलिसांना निरोगी व दीर्घायुषी जीवनासाठी त्यांना योगतज्ज्ञांकडून योगासनाचे धडे ‘योगा बाय द बे’ या कार्यक्रमातून देण्यात आले. मरिन ड्राईव्ह येथे त्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी स्वत:च्या आरोग्य सुधारण्यावर योगावर भर द्यावा, यासाठी शायना एनसी यांच्या आय लव्ह मुंबई ही संस्था आणि योगा ट्रेनर मिकी मेहता यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजिला होता. यावेळी मुंबई पोलिस आयुक्त जावेद अहमद, क्रिकेटपटू जहीर खान, अभिनेत्री सारा शर्मा उपस्थित होते. पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी पोलिसांवर कामाचा खूप ताण असतो, त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योगाची गरज आहे, मी त्यावर भर देत असल्याचे सांगितले.