मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी योगाची आवश्यकता - राज्यपाल चे.विद्यासागर राव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 01:57 PM2017-12-13T13:57:29+5:302017-12-13T13:57:50+5:30

एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे़. योगगुरु बाबा रामदेव यांनी डिजिटल युगात योगाचे महत्व पटवून देऊन आधुनिक आणि अध्यात्मिक अशा दोन विचारांना एकत्र आणले आहे, असे उद्गार राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी काढले. ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2017’ हा योग गुरु बाबा रामदेव यांना राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Yoga needs to be a strong nation - Governor K. Vidyasagar Rao | मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी योगाची आवश्यकता - राज्यपाल चे.विद्यासागर राव

मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी योगाची आवश्यकता - राज्यपाल चे.विद्यासागर राव

Next

मुंबई :  एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे़. योगगुरु बाबा रामदेव यांनी डिजिटल युगात योगाचे महत्व पटवून देऊन आधुनिक आणि अध्यात्मिक अशा दोन विचारांना एकत्र आणले आहे, असे उद्गार राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी काढले. ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2017’ हा योग गुरु बाबा रामदेव यांना राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आयटीसी ग्रँण्ट हॉटेल येथे एक्सचेंज मिडिया ग्रुप कलर्सतर्फे मीडिया आणि जाहिरात उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इयर 2017’ च्या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, सीओओ व्हायाकॉमचे राजनायक, एक्सचेंज फोर मीडिया ग्रुपचे अध्यक्ष अननाराग बत्रा, बिझनेस वर्ल्डचे अध्यक्ष नवल अहुजा आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, चार शतकाआधी समर्थ रामदास स्वामी यांनी एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी निरोगी व्यक्तींची आवश्यकता आहे असे सांगितले होते. पूर्वीच्या काळातही योगाला महत्व दिले जात होतेच मात्र योग शिक्षण देणारे योग गुरु आणि योग संस्था अत्यंत मर्यादित होत्या. योग गुरु रामदेव बाबांनी योग हा सार्वत्रिक पोहचवला आहे, त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. जाहिरात क्षेत्राला उद्देशून ते म्हणाले की, जाहिरात ही अत्यंत महत्वाची कला आहे. ग्रामविकास विभागामार्फत स्वयंसहायत्ता बचत गटांची दरवर्षी प्रर्दशन लावली जातात मात्र त्यांची जाहिरात न केल्यामुळे चांगल्या दर्जाची उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचू शकत नाहीत. जाहिरात क्षेत्राने ग्रामीण बचत गट, लघु उद्योग सर्वदूर पोहोचण्यासाठी मदत करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच यावेळी ‘इम्पॅक्ट द ग्रेट डिस्ट्रीब्युटर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानांकित पुरस्कार भावेश अग्रवाल, सुरेश नारायण, प्रसुन जोशी, संजीव महेत, आनंद कृपालू, अमिताभ कांत, आशिष भैसने यांना देण्यात आले.

Web Title: Yoga needs to be a strong nation - Governor K. Vidyasagar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग