आरोग्य विद्यापीठातर्फे लवकरच योगशिक्षण; रविवारी विसावा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:57 AM2018-06-09T00:57:01+5:302018-06-09T00:57:01+5:30

आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य विद्यापीठांतर्गत योगशिक्षणाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

Yoga training by Health University soon; Twilight anniversary day on Sunday | आरोग्य विद्यापीठातर्फे लवकरच योगशिक्षण; रविवारी विसावा वर्धापन दिन

आरोग्य विद्यापीठातर्फे लवकरच योगशिक्षण; रविवारी विसावा वर्धापन दिन

googlenewsNext

नाशिक : आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य विद्यापीठांतर्गत योगशिक्षणाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन रविवारी साजरा होणार असून, त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात शिक्षण, संशोधनाची संधी मिळण्यासाठी २० देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करार लवकरच करण्यात येणार आहे. योगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हैसेकर म्हणाले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरू होऊन राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या १०० जागा वाढल्याचेही ते म्हणाले.
कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ई-पेमेंट गेटवे’ ही आॅनलाइन शुल्क प्रणाली तयार केली असून विद्यापीठाच्या वर्धापन दिनापासून त्याचा लाभ घेता येऊ शकेल. पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व त्यांचे मूल्यांकनदेखील आॅनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे देशातील आपले एकमेव विद्यापीठ आहे.

संशोधन नियतकालिक लवकरच
संशोधन साहित्य प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाचे पहिले संशोधन नियतकालिक एमयूएचएस हेल्थ सायन्स रिव्ह्यू लवकरच प्रकाशित होत आहे. त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

रुग्ण-डॉक्टर संवाद : हल्ली रुग्णालये व डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्ण-डॉक्टर यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, गैरसमजाचे प्रसंग टाळण्यासाठी संवाद कौशल्य या विषयाचा वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

मेडिकल कॉलेज- ४०, दंतचिकित्सा- २९, आयुर्वेद- ६९, युनानी- ६, होमीओपॅथी- ४९, नर्सिंग- १०२, फिजिओथेरपी- ३८, अ‍ॅक्युपेशनल थेरपी- ६, बीएएसएलपी- ४, बीपीओ १, बी एस्सी आॅप्टोमेट्री-४ (एकूण- ३४८)

Web Title: Yoga training by Health University soon; Twilight anniversary day on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग