योगासनाने झाले सूर्यदर्शन

By admin | Published: June 22, 2016 12:40 AM2016-06-22T00:40:37+5:302016-06-22T00:40:37+5:30

योगदिंडी, योगगीते, योगप्रार्थना, योगाभ्यासाने शाळा व शहर परिसराचे वातावरण योगामय झाले. जागतिक योग दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये योगदिवस साजरा झाला

Yogasana has become the sunrise | योगासनाने झाले सूर्यदर्शन

योगासनाने झाले सूर्यदर्शन

Next

निगडी : योगदिंडी, योगगीते, योगप्रार्थना, योगाभ्यासाने शाळा व शहर परिसराचे वातावरण योगामय झाले. जागतिक योग दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये योगदिवस साजरा झाला. योग विषयातील अनेक तज्ज्ञमंडळींनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. योगा हा एक दिवस न करता दैनंदिन अवलंब झाला पाहिजे. योग हा चित्त, बुद्धी आणि मन जोडण्याचे कार्य करतो. जीवनात योगा हा सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. योगामुळे अनेक व्याधीवर मात करता येते. शरीर व मन संतुलित राखण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे, असा संदेश विद्यार्थ्यांना शाळांमध्ये दिला.
पतंजली योग समिती
येथील पतंजली योग समितीच्या वतीने मोरया मंगल कार्यालयात योग दिन साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, शिक्षण मंडळ सभापती चेतन भुजबळ, गजानन चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, लायन्स क्लबचे ओमप्रकाश पेठे, हिरामण भुजबळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. चरणदीप सिंग, लक्ष्मण पाटील, सुदराव हरणे, सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते. गुरूकुलम चिंचवड येथील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच जय गुरूदेव संघटना, पर्यावरण संवर्धन समिती, लायन्स क्लब, रोटरी क्लब, क्रांतिसूर्य प्रतिष्ठान आदी उपस्थित होते.
एस. बी. पाटील
एस. बी. पाटील आर्किटेक्चर विद्यालयात योग दिन साजरा झाला. मनीषा कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिकेही सादर करून दाखविली. उज्ज्वला पळसुले यांनी प्रास्ताविक केले.
टीकाराम जगन्नाथ विद्यालय
खडकी : येथील टीकाराम जगन्नाथ विद्यालयात योगा दिन साजरा झाला. या वेळी योगविद्याधाम सांगवी येथील विद्या माने, भारती यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ओंकारमंत्राने सुरूवात झाली. ताडासन, वृक्षासन आदी प्राणायमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. दिशा वांबूरकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष एस. के . जैन, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चिटणीस विलास पंगुडवाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
फत्तेचंद जैन महाविद्यालय
चिंचवड : येथील जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित,फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडाशिक्षक दाजी मदने, धोंडूबाई शिंदे, विजया बोठे, प्रणीता बोबडे, प्रिया शहा यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिके करून दाखवत योगाचे महत्त्व सांगितले.

महापालिकेच्या निगडी मुले क्रमांक दोन शाळेत जागतिक योगा दिन उत्साहात साजरा झाला. योगशिक्षक अमोल नागरे यांनी योगाची प्रार्थना घेतली. मुख्याध्यापिका विद्या शिंदे यांनी योगाचे मनुष्य जीवनातील महत्त्व सांगितले. जयश्री सालोटगी यांनी योगगीत मुलांपुढे सादर केले. सुभाष चटणे यांनी दररोज योगा करण्याचा संकल्प शाळेत केला. वर्तमानपत्रामधील योगाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. स्मिता उत्तेकर, कल्पना सोमा, स्वाती तावरे, मंगल राऊत, अरुणा कोतकर, लता खरात, भारती मानकर यांनी संयोजन केले.

Web Title: Yogasana has become the sunrise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.