योगेश सावंत याला मुंबई पोलिसांकडून अटक, १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 04:51 PM2024-02-29T16:51:41+5:302024-02-29T17:01:21+5:30
Yogesh Sawant Arrested By Mumbai Police: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी योगेश सावंत या तरुणाला अटक केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली मुंबईतील सांताक्रूझ पोलिसांनी योगेश सावंत या तरुणाला अटक केली आहे. त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून आज देण्यात आली.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषा वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनोळखी व्यक्तिविरोधात विरोधात कलम १५३ (ए), ५००, ५०५ (३), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद केला होता.
#UPDATE | Mumbai's Santa Cruz Police Station arrested the accused Yogesh Sawant for using derogatory language against Maharashtra Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis and threatening to kill him. He was presented before the court and the court sent him to… https://t.co/YkUwO9sAiE
— ANI (@ANI) February 29, 2024
दरम्यान, योगेश सावंत हा रोहित पवार यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. होय, योगेश सावंत हा माझा कार्यकर्ता असून त्याची चूक काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. तसेच उगाच भाजपानं नाटके करू नये. तो कार्यकर्ता आहे. त्याने काय चूक केली? एका युट्यूब चॅनेलने सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली ती त्याने त्याच्या सोशल मीडियावर टाकली. आता तुम्ही त्या युट्यूब चॅनेलवर कारवाई करत नाही. ज्याने मुलाखत घेतली त्याच्यावर काही करत नाही. मात्र या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता असा आरोप पवारांनी केला.