शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर योगी आदित्यनाथ

By Admin | Published: March 20, 2017 01:52 AM2017-03-20T01:52:48+5:302017-03-20T01:55:37+5:30

सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीत महाराजांच्या चेहऱ्यावर उत्तर प्रदेशातील् नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून

Yogi Adityanath on the face of Shivaji Maharaj | शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर योगी आदित्यनाथ

शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर योगी आदित्यनाथ

googlenewsNext

वसई : सिंहासनावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीत महाराजांच्या चेहऱ्यावर उत्तर प्रदेशातील् नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून तो सोशल मिड़ीयावर व्हायरल करण्याचा अतिरेकी प्रकार भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याविरोधात मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी सोशल मिडीयावर महाराजांच्या चेहऱ्याच्या जागी उत्तर प्रदेशाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावलेला फोटो विरारमधील भाजपप्रेमी अमित मिश्रा, संदीप सिंग, राकेश सिंग यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्याचे तीव्र पडसाद वसईतील मराठा समाज संघटनेत उमटले. राजाराम मुळीक, विनायक निकम, राजाराम बाबर, राजेश मातोंडकर, नरेश खोत, जयराम राणे, अनिकेत गुरव, बाळकृष्ण चौकेकर, संतोष घाग, विश्वास सावंत, दिनेश घाग, प्रवीण नलावडे यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापीही सहन केला जाणार नाही. हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणूनबुजून करण्यात आलेला ंिनंदनीय प्रकार आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. अन्यथा शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाचा उद्रेक होऊन त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील , असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, भाजपाचे वसईतील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर धुरी यांनी मात्र अप्रत्यक्षरित्या या फोटोेचे समर्थन केले आहे. हिंदी भाषिक तरुणांनी भावुक होऊन हा प्रकार केलेला आहे. यात महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नाही. उलट यामागे देशभक्तीचा विचार असून शूरतेला केलेले वंदन आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा, असा संदेश यातून तरुणांनी दिला आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. धुरी यांच्या वक्तव्यानंतर वसईतील मराठा समाजातील नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. धुरी स्वत: मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी होत असतात. असे असताना त्यांनी केलेले समर्थन दुदैवी आहे असेही नेत्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Yogi Adityanath on the face of Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.