तुम्हीही बोलू शकणार ‘गोंडी’

By admin | Published: November 10, 2014 11:07 PM2014-11-10T23:07:08+5:302014-11-10T23:07:08+5:30

आता भाषाप्रेमींना आदिवासींची ‘गोंडी’ भाषा जाणून घेण्यासाठी फार प्रयास करावे लागणार नाहीत, या भाषेच्या संदर्भासाठी तयार करण्यात येत असलेला ‘शब्दकोश’ भाषाप्रेमींच्या हाती मिळणार आहे.

You can also talk about 'Gondi' | तुम्हीही बोलू शकणार ‘गोंडी’

तुम्हीही बोलू शकणार ‘गोंडी’

Next
नम्रता फडणीस - पुणो 
आता भाषाप्रेमींना आदिवासींची ‘गोंडी’ भाषा जाणून घेण्यासाठी फार प्रयास करावे लागणार नाहीत, या भाषेच्या  संदर्भासाठी  तयार करण्यात येत असलेला  ‘शब्दकोश’ भाषाप्रेमींच्या हाती मिळणार आहे.   आणि तोपण देवनागरी लिपीमध्ये! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना भाषातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या मूळ भाषेतून आपली मराठी आकाराला आली आहे, त्या मूळ ‘गोंडी’ भाषेला दर्जा मिळवून देण्याच्या द्ृष्टीने भोपाळ येथील  ‘सीजीनेट’ (स्वर) या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून, त्याचा शब्दकोश तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच देवनागरी लिपीमध्ये हा शब्दकोश भाषाप्रेमींना उपलब्ध होणार आहे. 
यासंदर्भात  सुभ्रांशू चौधरी म्हणाले, की मध्य भारतातील 6क् तज्ज्ञ गटांच्या दोन बैठका दिल्ली आणि कर्नाटक येथे झाल्या. प्रत्येकाने शंभर शब्दांवर काम केले आणि 25क्क् शब्दांचा कोश तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये लिपी, भाषातज्ज्ञ आणि भाषिक यांच्या उपस्थित या कोशाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. केंद्र शासनाकडे हा शब्दकोश पाठविण्यात येईल. तसेच शब्दकोशाबरोबर सहा महिन्यांत युनिकोडच्या माध्यमातून गोंडी भाषा देवनागरीमध्ये भाषाप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापुढचे पाऊल म्हणजे भारतीय संविधानाच्या सूची 8 मध्ये ‘गोंडी’ भाषेचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात 
येणार आहेत. (प्रतिनिधी)
 
गोंडी ही मूळ भाषा असून, त्यातून मराठी, तेलुगू, तमीळ भाषा निर्मित झाल्या आहेत. आज मूळ गोंडी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या भाषेला ािस्तपूर्व  5क्क्क् वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीचा वारसा लाभला आहे. गोंदी संस्कृतीची मानक मूल्ये हडप्पा-मोहोंजोदडोच्या संस्कृतीमध्येही आढळतात. म्हणूनच शब्दकोश निर्मित करण्यात येत आहे.
- मोतीरावन कंगाली, 
गोंडी भाषा अभ्यासक 
 
1 भारतात ‘गोंडी’ ही मोठय़ा संख्येने बोलली जाणारी दुस:या क्रमांकाची आदिवासी भाषा आहे. आज गोंडवाना आणि मध्य भारतात ही भाषा मोठय़ा प्रमाणावर बोलली जाते. 
2जवळपास 30 लाख लोक ही भाषा बोलत असूनही त्याची लिपी उपलब्ध नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि छत्तीसगड आदी सहा राज्यांमध्ये प्रामुख्याने या भाषकांची संख्या आढळते. 

 

Web Title: You can also talk about 'Gondi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.