'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:13 PM2020-06-29T15:13:09+5:302020-06-29T15:19:18+5:30

प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.

'You have no moral right to speak on this subject'; Fadnavis thrashes NCP! | 'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले!

'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले!

Next

धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते. 

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उमटत आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते नेते यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी अमरावतीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन केलं नव्हतं. गोपीचंद पडळकर यांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीला राजकारण करायचं आहे. त्यामुळे पडळकरांच्या विधानावरुन वाद कसा वाढवता येईल, असा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच जेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपाविरोधात खालच्या पातळीवर टीका करत होते, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे खरे तर राष्ट्रवादीला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं होतं-  

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

पडळकरांना नशा चढलीय, पवारांच्या अनुभवापुढे ते डासाएवढेही नाहीत; गोटेंची जळजळीत टीका

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

Web Title: 'You have no moral right to speak on this subject'; Fadnavis thrashes NCP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.