करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:54 AM2020-09-27T00:54:38+5:302020-09-27T00:55:16+5:30

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

You need more than luck to succeed in affiliate business. | करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

Next
ठळक मुद्देबारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

बारावी विज्ञान शाखेनंतर काय? प्रत्येक विद्यार्थी, आईवडिलांना पडलेला प्रश्न. त्यातच अभियांत्रिकीत प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक पालकाला वाटते की, आपल्या पाल्याने संगणक शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवावी व एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी. परंतु सध्या ती परिस्थती राहिलेली नाही. आपल्या पाल्याच्या करिअरचा विचार करून सर्व पालकांनी थोडे कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे.

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे; परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत. महाराष्टÑात वसलेल्या या भारतातील एकमेव शिक्षण संस्थेचा फायदा इतर राज्यांतील विद्यार्थीच जास्त घेत असून, आजमितीस शिक्षण पूर्ण केलेले हे सर्व विद्यार्थी उच्च पद भूषवित आहेत किंवा मोठ्या पगाराच्या नोकºया अथवा व्यवसाय करीत आहेत.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (एनएफएसी) या महाविद्यालयात अग्नी विषयात इंजिनीअरिंगची पदवी (इ.ए. - ऋ्र१ी) हा चार वर्षांचा पाठ्यक्रम १९७८ पासून चालवला जातो. या पाठ्यक्रमाला (अकउळए) ची मान्यता असूनही प्रशिक्षण संस्थेशी (फळटठव) संलग्न आहे. या पाठ्यक्रमाच्या सहाव्या बॅचची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील. या पाठ्यक्रमाला दरवर्षी ६० जणांना ‘जेईई मेन’च्या सी.आर.एल. रँकवरून प्रवेश दिला जातो. याव्यतिरिक्त शारीरिक मोजमापे योग्य असणेही प्रवेशासाठी आवश्यक आहे.
चार वर्षे जरी प्रशिक्षण संस्थेत राहावे लागत असले तरी पाठ्यक्रम पूर्ण होताच कॅम्पसच्या मुलाखतीत मुलांना बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळते.
नोकरीव्यतिरिक्त अग्निशमनच्या यंत्रसामग्रीतही व्यवसाय करायला भरपूर वाव असून, इ.ए. - ऋ्र१ी ही पदवी मिळाल्यानंतर या विषयात पीएच.डी. करून सेंट्रल बिल्डिंग रीसर्च इन्स्टिट्यूट (उइफक), रुरकीसारख्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणून काम करू शकतो. परंतु पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी नोकरी हाच पर्याय निवडतात व पुढील काळात स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाचे मान्यताप्राप्त छोट्या कालावधीचे पाठ्यक्रम पूर्ण करून आपल्या करिअरला झळाळी देऊन स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरण विभागाच्या उच्च पदावर विराजमान होतात. सर्वच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत या विभागाला फार महत्त्व असून नोकरीच्या भरपूर संधी देश-विदेशात, जास्त करून आखाती देशात उपलब्ध आहेत.

(लेखक मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी आहेत.)

सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे. अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत.
 

Web Title: You need more than luck to succeed in affiliate business.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.