आप’ने पाठीत सुरा खुपसला
By admin | Published: July 4, 2016 07:41 PM2016-07-04T19:41:05+5:302016-07-04T19:41:05+5:30
आम आदमी पार्टीने आपल्या पाटीत सुरा खुपसल्याचा आरोप या पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढविलेल्या आणि आता कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या स्वाती केरकर
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ४ : आम आदमी पार्टीने आपल्या पाटीत सुरा खुपसल्याचा आरोप या पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढविलेल्या आणि आता कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या स्वाती केरकर यांनी कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून केला. पक्षात आपले महत्त्व वाढेल या भितीने लोकांच्या समस्या उचलून धरण्यास आप नेत्यांनी आपल्याला हरकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आम आदमी पक्ष हा आम आदमीचा पक्ष असल्याच्या समजात कुणीही राहू नये, हा पक्ष बड्या लोकांचा आणि बड्या लोकांसाठीच आहे. सामान्य माणसांना त्यात स्थान नाही. त्यामुळे या पक्षाच्या नादाला कुणी न लागण्याचे आवाहन त्यांनी केले. हा पक्ष सामाजिक कार्यकर्त्यांंचा आहे असे आपल्याला सांगण्यात आले होते. आपण मागील काही वर्षे सातत्याने सामाजिक चळवळीत असल्यामुळे हा पक्ष आपल्याला त्या दृष्टीने आधार वाटला होता. परंतु प्रत्यक्षात अपेक्षा भंग झाल्याचे त्यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीला राम राम ठोकून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले आणखी एक युवा नेते अविनाश तावारीस यांनी ‘आप’ हा भाजपचीच टीम असल्याचे सांगितले. आपमधील कार्यकर्ते व नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोक असल्याचेही ते म्हणाले. आपला या पक्षात मोठा अपेक्षा भंग झाल्यामुळे पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्याचे ते म्हणाले.
आपचे आणखी एक कार्यकर्ते नीळकंठ गावस यांनीही आपच्या कारभारावर टीका केली. गोव्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पक्ष पैसे खर्च करतो आहे त कठून येत आहे याचे उत्तर त्यांनी अगोदर द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. गावसही आप सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.