तुम्ही पाहता, ते मीपण पाहतो...

By admin | Published: September 12, 2015 01:58 AM2015-09-12T01:58:28+5:302015-09-12T01:58:28+5:30

‘विद्यार्थी रात्री काय पाहतात, हे मला माहीत आहे. तुम्ही काय पाहता, ते मीपण पाहतो. त्यामुळे असे समजू नका, आम्ही म्हातारे-कोतारे झालो आहोत. आमचे देठ अजून हिरवे आहेत,’

You see, they see me ... | तुम्ही पाहता, ते मीपण पाहतो...

तुम्ही पाहता, ते मीपण पाहतो...

Next

पुणे : ‘विद्यार्थी रात्री काय पाहतात, हे मला माहीत आहे. तुम्ही काय पाहता, ते मीपण पाहतो. त्यामुळे असे समजू नका, आम्ही म्हातारे-कोतारे झालो आहोत. आमचे देठ अजून हिरवे आहेत,’ असे वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी केले. विद्यार्थी हक्क परिषदेत बोलताना विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकताना बापट यांनी सैलसर वक्तव्य केले.
काही विद्यार्थ्यांनी बापट यांच्या भाषणादरम्यान ‘या परिषदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी बोलायला आलो आहोत, असे ऐकायला नाही,’ असे म्हणत आयोजकांकडे नापसंती व्यक्त केली. या वक्तव्याबाबत खुलासा देताना बापट म्हणाले, की माझ्या म्हणण्याचा अर्थ रात्री अभ्यासाच्या गोष्टी वाचा, तसल्या काही गोष्टी पाहू नका असाच होता. भाषणात बोलून गेलो, पण ते नसते बोलले तरीही चाललेच असते.

तुम्ही ज्या क्लिप्स बघता त्या क्लिप्स आम्ही बघतो, असा माझा बोलण्याचा हेतू नसून, तुम्ही जे बघता ते आम्ही बघतो म्हणजेच ते आम्हाला माहीत असते, असा हेतू त्यामागे होता. या संदर्भात काही वाक्ये मी अनावधानाने बोलून गेलो. मुलांशी खेळीमेळीने बोलण्याचा माझा हेतू होता. त्यात अश्लील भाव नव्हता. माझ्या अनावधानाने बोलण्याबद्दल मला खेद वाटतो. हा विषय येथेच संपवावा.
- गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे

Web Title: You see, they see me ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.