"...माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस," एकनाथ शिंदेंच्या पत्नीला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 02:31 PM2022-07-11T14:31:54+5:302022-07-11T14:32:31+5:30

एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नी लता शिंदे यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

You stood firmly behind me chief minister eknath shinde wisher his wife lata shinde happy birthday shares photo | "...माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस," एकनाथ शिंदेंच्या पत्नीला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा

"...माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस," एकनाथ शिंदेंच्या पत्नीला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा

googlenewsNext

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगलं होतं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नी लता शिंदे यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

"जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस, सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास. तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता, वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसंच त्यांनी आपल्या लता शिंदे यांच्यासोबत एक फोटोही शेअर केला आहे.

साजरा केला होता आनंद
मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे ठाण्यात परतल्यानंतर लता शिंदे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी त्यावेळी चक्क ड्रम वाजवत आपला आनंद साजरा केला होता. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

वाचा - कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम, Video तुफान व्हायरल

Web Title: You stood firmly behind me chief minister eknath shinde wisher his wife lata shinde happy birthday shares photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.