'तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, अन्यथा...; पोहरादेवीच्या महंतांचा चित्रा वाघ यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:21 PM2022-08-12T19:21:27+5:302022-08-12T19:22:16+5:30

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवल्यामुळे पोहरादेवीच्या महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

'You tie a rakhi to Sanjay Rathod, otherwise...; Pohradevi's mahant's warning to Chitra Vagh | 'तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, अन्यथा...; पोहरादेवीच्या महंतांचा चित्रा वाघ यांना इशारा

'तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, अन्यथा...; पोहरादेवीच्या महंतांचा चित्रा वाघ यांना इशारा

Next

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागणारे सजंय राठोड (Sanjay Rathod) यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रिपद मिळाले आहे. संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन विरोध सरकारवर टीका करत आहेत. भाजप नेत्या चित्रा (Chitra Wagh)  वाघ यांनीदेखील राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आता पोहरादेवीच्या महंतांनी चित्रा वाघ यांना यावरुन कडक शब्दात इशारा दिलाय. 

संजय राठोड यांच्या मंत्रिपदामुळे राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे चित्रा वाघ यांनी राठोडांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवला तर तिकडे मंत्रिपदाला विरोध केल्याने पोहरादेवीच्या महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यता महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराच पोहरादेवीच्या महंतांनी दिला आहे.

पोहरादेवीचे महंतांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना गंभीर इशारा दिला आहे. महंत म्हणाले, 'केवळ प्रसिद्धीच्या मोहात जाऊन काही बडबड करू नका. तुम्ही बुद्धीवान असाल तर, संजय राठोड यांच्या हाताला जाऊन राखी बांधा. तुम्ही त्या ठिकाणी पापक्षालन करा. जेव्हा आमचे संत-महंत धर्मपीठावरून आदेश देतील, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात फिरायला जागा मिळणार नाही. संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर आरोप होत असेल तर, येणाऱ्या 2024 मध्ये त्यांची जागा दाखवू,' असा इशाराही महंतांनी यावेळी दिला. 
 

Web Title: 'You tie a rakhi to Sanjay Rathod, otherwise...; Pohradevi's mahant's warning to Chitra Vagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.